कृषीदिन आणि वसंतराव नाईक जयंती ,वसंतराव नाईक महाविद्यालयात उत्साहात साजरी
नवीन नांदेडl वसंतराव नाईक राज्याच्या हरितक्रांतीचे खरेखुरे प्रणेते अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक हे खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या हरितक्रांतीचे खरे खुरे प्रणेते होत,राज्याच्या विकासासाठी हरितक्रांतीचे महत्त्व ओळखून वसंतराव नाईक यांनी केलेले कार्य अमूल्य आहे,असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर विद्याशाखीय अभ्यास शाखेचे अधिष्ठाता चंद्रकांत बाविस्कर यांनी केले.
वसरणी नांदेड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी ‘वसंतराव नाईक यांच्या कृषीविषयक धोरणांची कालातितता’ या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून व्याख्यान देताना डॉ. चंद्रकांत बाविस्कर बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या कृषी दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.व्ही.आर.राठोड हे होते. पुढे बोलताना अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनात महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. साहेबराव शिंदे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.नागेश कांबळे यांनी आभार मानले.
कृषी दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रो.डॉ. रेणुका मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ व्यंकटेश देशमुख,डॉ.प्रदीप बिरादार, प्रा.डॉ.जी.वेणुगोपाल, डॉ.अनिल गच्चे,डॉ.दिलिप पालिमकर,डॉ.संतोष शिंदे, डॉ.गणेश लिंगमपल्ले, डॉ.सुनिता गरुड,कार्यालयीन अधीक्षक आर.डी.राठोड,
डॉ.संजय गिरे,डॉ.उत्तम कानवटे,डॉ.आर. एम. कागणे, डॉ.साहेबराव मोरे, डॉ.विजयकुमार मोरे,प्रा. पी. बी. चव्हाण,प्रा.जायदे मॅडम, प्रा.नंदिनीसुधळकर,प्रा.माधव मुस्तापुरे,प्रा. शेख, प्रा.कोतवाल,प्रा.कपील हिंगोले, प्रा.शशीकांत हाटकर,डॉ.लालबा खरात, डॉ.शोभा वाळुक्कर, डॉ.ललिता आय्या, प्रा.नितीन मुंडलोड,प्रा.भुमरे,डॉ. सरोदे यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.