माहूर, इलियास बावानी| हरितक्रांतीचे प्रणेते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य अभिवादन कार्यक्रम आयोजित न करता महापुरुषाचा अवमान केल्या प्रकरणी वाई बा. महावितरण कार्यालयचे अभियंता श्री कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध निलंबनाची व महापुरुष अवमान प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावयाची कारवाई करा अशा मागणीचे निवेदन दि. २ जुलै २०२५ रोजी उप कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय माहूर यांना गोर सेनेच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी दिले. त्यानंतर आज दि. ७ जुलै रोजी माहूर तालुक्यातील लांजी बायपास सेवालाल महाराज चौक येथे गोर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वंसतराव नाईक हे हरितक्रांतीचे प्रणेते असून संपूर्ण देशभरातील कृषक समाजाचे श्रद्धास्थान आहे. महाराष्ट्र राज्याच्या व भारत देशाच्या कृषी क्षेत्रातील त्यांचे योगदान हे अनन्य साधारण असे आहे. त्यामुळेच शासनाच्या वतीने शासन स्तरावर त्यांचा जयंती दिन १ जुलै हा कृषीदिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. जयंती दिन शासकीय कार्यालय साजरा करून वंसतराव नाईक यांना अभिवादन करण्याचे शासनपरिपत्रक व आदेश असतांना वाई बाजार महावितरण कार्यालयात कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी जाणीवपूर्वक व व्देष भावनेतून हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्य त्यांच्या अधिनस्त वाई बा. महावितरण शाखा कार्यालयात वसंतराव नाईक जयंती व अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले नाही.

सदरील कनिष्ठ अभियंता कट्टर मनुवादी प्रवृतीचा असून त्यांनी आजपर्यत त्यांच्या अधिनस्त कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महात्मा ज्योतिबा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान बिरसा मुंडा जयंती आदी महापुरुषांच्या जयंती निमित्य शासनाचे निर्देश असतांना त्यांनी कधीही अभिवादन कार्यक्रम आयोजित केले नाहीत अशी माहिती असून दि. ०१ जुलै २०२५ रोजी त्यांनी वंसतराव नाईक जयंती अभिवादन सोहळा आयोजित न करण्याचे काम जाणीवपूर्वक केलेले आहे असाही आरोप निवेदनात करण्यात आला होता.विशेष बाब म्हणजे ते दि.१ जुलै २०२५ रोजी दिवसभर कार्यालयात उपस्थित होते असेही निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे शासकिय आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी व महापुरुषांची अवहेलना केल्या प्रकरणी वाई बा.महावितरण कार्यालय चे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध निलंबनाची व महापुरुष अवमान प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यावेळी रास्ता रोको आंदोलन करून गोर सेनेच्या पदाधिकारी व समाज बांधव यांची माफी वाई बा येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांनी मागितली. या आंदोलनात प्रल्हाद कारभारी, मनोज कीर्तने, अर्जुन आडे, किसन राठोड, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष् प्रफुल जाधव यांची भाषणे झाली.
या रास्ता रोको आंदोलनात गोर सेनेचे तालुकध्यक्ष प्रफुल जाधव यांच्या नेतृत्वात, किसन राठोड, अर्जुन आडे, मनोज कीर्तने, प्रल्हाद राठोड, यादव आडे, संदेश नायक, संदीप राठोड, विट्ठल राठोड, कृष्णा राठोड, प्रल्हाद कारभारी, गणेश राठोड, विष्णू कारभारी, विक्रम राठोड, अर्जुन राठोड, निकेश राठोड, आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
