शासकीय रुग्णालयातील मृत्यकांडास जबाबदार राज्य सरकार विरुद्द वंचित बहुजन आघाडीचे तीव्र आंदोलन
नांदेड| शासकीय रुग्णालयातील मृत्यकांडास जबाबदार राज्य सरकार जबाबदार असून या मृत्यू कांडावर राज्य सरकारने जवाब दयावा अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केले व धरणे धरले . यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकार जवाब दो. मुख्यमंत्री जवाब दो. खा. हेमंत पाटील मुर्दाबाद, हेमंत पाटील याना अटक झालीच पाहिजे असा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
यावेळी नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल याना दिलेल्या निवेदनात नांदेड जिल्ह्याची लोकसंख्या 35 लाखांहुन अधीक असुन नांदेड जिल्ह्याचे शासकीय रुग्णालय हे शहरात वजिराबाद येथे श्री गुरुगोविंदसिंगजीच्या नावाने असुन तेथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले होते व नंतर सदरील महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी येथे स्थलांतरीत करण्यात आले व शहरातील शासकीय रुग्णालय ओसाड पडले असुन गंभीर रुग्णांना शहराच्या बाहेर विष्णुपुरीला घेऊन जावे लागत आहे. नांदेड पेरीफेरीचा व्याप सभोवतील चार जिल्ह्यांचा व तेलंगाना आणि कर्नाटक राज्य सिमा लगत असुन सदरील रुग्णालयावर अधीकचे ओझे आहे. सदरील रुग्णालयास फक्त 508 खाटांची मान्यता असुन त्या मानाने ही कर्मचारी व औषध पुरवठ्याचा प्रचंड तुटवडा आहे या उलट तेथे 1080 खाट व सरासरी 12-1500 रुग्ण ॲडमीट होत असतात. याचाच परिणाम आहे की नांदेड येथे रुग्ण दगावण्याची सरासरी खुप जास्त आहे. नांदेड येथे एमआरआयची सुविधा नसुन अनेक महिण्यापासुन सिटीस्कॅन मशीन सुध्दा बंद आहे.
लाईफ सेव्हिंग इक्विपमेंटची सुध्दा कमतरता आहे या मुळे मृत्युंचे तांडव सुरु असुन यासाठी राज्य सरकारच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनात गोर गरीब बहुजन वंचित रुग्णांच्या मृत्युस कारणीभुत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील मृत्युसत्राची व टेंडर आणि भ्रष्ट कारभाराची उच्च न्यायलयाच्या न्यायाधीशांकडुन चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, नांदेड शहरातील श्री गुरुगोविंदसिॅगजी शासकीय जिल्हा रुग्णालय १ हजार खाटांसहीत तात्काळ सुरु करा, देगलुर नाका येथील मनपाच्या जागा व हैदरबाग प्राथमाक आरोग्य केंद्राच्या इमारती मध्ये व पावडेवाडी येथे शासकीय रुग्णालयाचे २०० खाटांचे विस्तारीत केंद्र सुरु करा, अधिष्ठाता डॉ वाकोडे याना वागणुक देणा-या व ॲट्रासिटी ॲक्टचा गुन्हा दाखल असलेले खासदार हेमंत पाटील यांना ४८ तासात अटक करा.
ॲट्रासिटी ॲक्टच्या अंतर्गत आरोपी असलेले हेमंत पाटील यांच्या जातीयवादी कृतीचे समर्थन करणा-यांवर गुन्हा दाखल करा. त्याचबरॊबर नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात दबंगगिरी करणाऱ्या खाजगी गुत्तेदाराचे टेंडर रद्द करा. औषधासाठी रुग्णालय प्रशासनाला दुप्पट निधी उपलब्द करून द्या. आदींसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात झाली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी आपल्या मनोगतात या घटनेचा निषेध करीत दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. यावेळी राज्य प्रवक्ता फारुख अहेमद, मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुऱ्हे, महानगर अद्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब पठाण , जिल्हाध्यक्ष राजेश हत्तीअंबीरे , शिवा नरंगले, महानगर महिलाद्यक्षा चंद्रकला चापलकर ,माजी जिल्हाद्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, महासचिव श्याम कांबळे, तालुकाध्यक्ष विनायक गजभारे, रामचंद्र वंणजे, मुकुंद नरवाडे, अशोक काकांडीकर, अशोक, कापसीकर, दीपक कसबे, प्रा. राजू सोनसळे, ऍड. यशोनील मोगले, बहुजन लोकन्याय संघाचे राहुल चिखलीकर, माधव चित्ते, रावण साम्राज्य सेनेचे काकासाहेब डावरे गयाताई कोकरे, साधना येंगडे, मंगेश देवकांबळे आदींची यावेळी भाषणे झाली.
यावेळी युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशव कांबळे, सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे भीमराव सूर्यवंशी , युवा जिल्हाध्यक्ष धीरज हाके, संजय टिके, भीमराव बेंद्रीकर , सुरेश गजभारे, देवांनंद सरोदे, शंकर महाजन, डॉ भेदे, गोपालसिहं टाक, वैभव लष्करे, विनय मोरे, हिदायत खान पठाण, शेख अकबर, संतोष पाटील, सतीश आणेराये, रामकिशन पालनवार , एकनाथ जिंकले, गौतम देवके , साहेबराव डोईवाड, सुदर्शन कांचनगिरे, संदेश गायकवाड, प्रकाश सोंडारे, शरद सूर्यवंशी, संघसेन जोंधळे, साहेबराव भंडारे, धम्मदीप येंगडे, शिवाजी पवार, दिनेश, कांबळे, इम्रान पठाण, माधव गोवंदे प्रभाकर घंटेवाड, बबन जोंधळे, प्रेमानंद गायकवाड, दीपक मगर, कोश्यल्याताई रणवीर, विजया वाघमारे, सोनिया गायकवाड, सुनंदाताई वंणजे, ममता भद्रे, दीपक गजभारे, केशव सदावर्ते, केतन भेडेकर, नागेश दुधमल, सोपान वाघमारे, रवी शेळके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ४८ तासात खा. हेमंत पाटील यांना अटक झाली नाही तर संविधानिक मार्गाने उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे.