
नवीन नांदेड। राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण एन एच ३६१ वरील नागपूर नांदेड लातूर मार्गावर असलेल्या नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील जागा रस्ता लगत असलेल्या गट क्रं ३८/२/१ मधील क्षेत्र ३०० चौरस मीटर जागा भूसंपादन करून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारक साठी लावण्यात आलेल्या नामफलकाचे अनावरण सोहळा २९ डिसेंबर रोजी करण्यात आला, यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व समाज बांधवांनी दिलेल्या प्रतिसादानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला,या निर्णयाचे समाजबांधवांनी घोषणा देत स्वागत केले.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नागपूर नांदेड लातूर महामार्ग वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मारक व पूर्णाकृती पुतळा यासाठी नियोजित जागेचे नामफलकाचे अनावरण उपविभागीय अधिकारी विकास माने , सुरेश गायकवाड,ग्रामीण पोलीस स्टेशन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप,व सिडको क्षेत्रीय कार्यालयचे सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचे मोतीराम गजभारे, समाजातील मान्यवर,प्रतिष्ठीत,समाज बांधव यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण करून वंदना घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो,जय भीम घोषणा देत हा भूसंपादन व नामफलक अनावरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी, उपस्थित मान्यवर यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करण्यात आले.
नांदेड लातूर महामार्ग वरील सिडको लातूर फाटा येथे ६ डिसेंबर १९८३ साली वसरणी ग्रामपंचायत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नियोजित जागा असे नामकरण करण्यात आले होते,यावेळी स्मारक समिती अध्यक्ष म्हणून मोतीराम गजभारे यांनी मनपा,जिल्हा प्रशासन यांच्या कडे मागणी केली होती. वाघाळा नगर परिषद मध्ये नगरसेविका स्नेहा मोतीराम गजभारे यांनी १९९४ ला ठराव दाखल केला होता त्यानंतर झालेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मध्ये ही याबाबत मागणी करण्यात आली होती.
अखेर या मार्गावर महामार्ग जात असल्याने हा चौक या कामी अडथळा येत असल्याने नियोजित जागी भूसंपादन करून पूर्णाकृती पुतळा व स्मारक यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व खासदार प्रताप पाटील चिखलीकर व समाज बांधवांची व स्मारक समिती पदाधिकारी यांच्या तिन ते चार बैठक झाली. अखेर समन्वयाने चौका लगत असलेल्या रस्ता लगत जिल्हाधिकारी नांदेड यांच्ये भूसंपादन विषयक आदेश क्रमांक २०२३/ अरबी – डेस्क ३ भूसंपादन नावामनपा /सी आर ४५ १३/१२/२३ मोजे वसरणी ता.जि. नांदेड गट क्रं. ३८/२/१ क्षेत्र ३०० चौरस मीटर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरक पुतळा पूर्णाकृती पुतळा नियोजित जागा दिली यांच्या नामफलक अनावरण २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता करण्यात आला.
यावेळी मंडळ अधिकारी अनिल धुंळगडे, यांच्या सह के.टी.एल कन्सट्रक्शनचे मोतीलाल बाकले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मॅनेजर नवीन सिरी,अभियंता आनंद पुयड, जेष्ठ समाजिक कार्यकर्ते पि. एस. गवळे,नरसिंग दरबारे,विलास गजभारे,राजु लांडगे, विठ्ठल गायकवाड, वैजनाथ देशमुख, संजय जौधंळे,साहेबराव भंडारे,अमृत नरगंलकर, व्यंकट इंगळे,प्रसेनजित वाघमारे, भिमराव बेरजे,मोतीराम गायकवाड,नंदकुमार गच्चे, संतोष सावते, संजय निळेकर, देवानंद सरोदे,हाटकर,संबोधी सोनकांबळे ,दिंगाबर मोरे, वैजनाथ सुर्यवंशी, वाघमारे शेषराव,व्यंकटराव इंगळे,प्रल्हाद लोखंडे,प्रकाश भुरे,अशोक कोल्हे,प्रा.प्रबुद्ध चिते,सिध्दार्थ धुतराज,नवनाथ कांबळे, यांच्या सह आंबेडकर वादी मशिन चे विधार्थी व समाजबांधव पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
