उस्माननगर। महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परीषद पुणे यांची मान्यता प्राप्त कलाशिक्षकांची संघटना- महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे- शाखा जिल्हा नांदेडची नुकतीच कार्यकारनीची निवड बिनविरोध निवडून करण्यात आली .
यामध्ये सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी-सुनिल कोमावाड तर जिल्हा सचिव पदी राजीव अंबेकर यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष-सुर्यकांत गायकवाड, कोषाध्यक्ष-राजाराम सुर्यवंशी, सहसचिव-संजय बावस्कर,संघटक-रांजेद्रसिहं बैस,-प्रसिद्धी प्रमुख-धोंडीबा तेलंग,महिला प्रतिनिधी-सुनिता बुरांडे,सदस्य-संजय नखाते,सुरेश कुराडे,मार्गदर्शक-अर्जुन गुंडाळले,विलास झोळगे यांची निवड करण्यात आली. राज्य कोषाध्यक्ष विजयसिंह ठाकुर यांनी निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी जिल्ह्यातील असंख्य कलाशिक्षक उपस्थित होते.