श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी चे निकाल आज रविवारी हाती आले असून काँग्रेस,भाजपा व शिंदे गट शिवसेनेच्या पॅनलला केवळ ४,तर १४ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – शिवसेना (उद्घव बाळासाहेब) व माकपा प्रेणीत बळीराजा विकास आघाडीने एकतर्फी विजय मिळविला.
या निकालानंतर माहूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचे आमदार भीमराव केराम काँग्रेसचे पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे व युवा नेता सचिन नाईक यांना जोरदार धक्का बसला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रदीप नाईक, शिवसेनेचे (ठाकरे गट) ज्योतिबा खराटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकर सिडाम यांनी आपला गड राखला आहे.
त्यातही काँग्रेसचे जिल्हा बँकेचे संचालक, माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक राजेंद्र केशवे यांच्या सुविद्य पत्नी संध्याताई राजेंद्र केशवे यांचा केवळ एका मताने विजय झाला त्यामुळे ह्या जागेसाठी फेर मतमोजनी घेण्यात आली. एकंदरीत बळीराजा शेतकरी विकास पॅनेल महाविकास आघाडीला १४ तर भाजप-काँग्रेसला ४ जागा मिळाल्या. १४ जागा मिळवून माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या आघाडिने वर्चस्व सिद्ध केले.हा विजय माझा नसून संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रदीप नाईक यांनी दिली .
राष्ट्रवादी शिवसेना (उबाठा),माकप आघाडीचे विजयी उमेदवार सोसायटी मतदार संघ :गुमानसिंह चुंगडे,मेघराज जाधव,आत्माराम भुसारे, दत्तराव मोहिते,पुरुषोत्तम येरडलावार, अनिल रुणवाल,उस्मान खान,विनोद जयस्वाल, निखिल जाधव, रूक्मीनाबाई कन्नलवार, ग्रामपंचायत मतदार संघ: अभिजीत राठोड, हमाल मापारी मतदार संघ: विष्णू जाधव, व्यापारी मतदारसंघ(बिनविरोध): बिनविरोध पवन जयस्वाल,अतिश गेंटलवार.
भाजप-काँग्रेस,शिवसेना आघाडीचे विजयी उमेदवार – सोसायटी मतदार संघ : संध्याताई राजेंद्र केशवे, ग्रामपंचायत मतदार संघ : मडावी गणपत,जयकांत मोरे व सुगंधा गजानन खूपसे