कृषीनांदेड

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम अंतर्गत आतापर्यंत 130.10 कोटी रुपयांचा पिक विमा वाटप

नांदेड| प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2023 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत आतापर्यंत 130.10 कोटी 25 टक्के अग्रिम पिक विमा वाटप करण्यात आला आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्व 93 महसूल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थिती (मिड सिझन अँडव्हर्सिटी) मंजूर करण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यास 285 कोटींचा 25 टक्के अग्रिम मंजूर झाला आहे. त्यापैकी आता पर्यंत 130 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती विमा कंपनी दिली आहे. यावर्षी प्रथमच केंद्र शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आधार प्रणालीद्वारे प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पोर्टलवरून नुकसान भरपाई रक्कम अदा करण्यात येत आहेत.

पिक विमा नुकसान भरपाई अदा करण्यास होत असलेल्या विलंबासंबंधी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचेमार्फत पाठपुरावा चालू आहे. नुकसान भरपाई अदा करण्यास पोर्टलवरील काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब होत असून लवकरच उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती विमा कंपनीने दिली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!