राम नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी, महाकाल आघोरी पथकने वेधले उमरखेडकरांचे लक्ष
उमरखेड,अरविंद ओझलवार। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त उमरखेड शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेत श्रीराम मित्र मंडळ , सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव मंडळ , श्रीराम आरती मंडळश्रीराम जन्मोत्सव समिती बजरंग दल विश्व हिंदू परिषददुर्गा वाहिनी शिवप्रतिष्ठान मंडळ यासह विविध मंडळांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता .
या शोभा यात्रेत विविध प्रकारच्या झाकीयासह सहभाग नोंदविला होता . शोभायात्रेतील सार्वजनिक जन्मोत्सव मंडळातील हरियाणा येथील महाकाल अघोरी पथक व श्रीरामचंद्रांची भव्य मूर्तीने उमरखेड वाशी यांचे लक्ष वेधले होते .
या सह दर्यापूर येथील साहसी खेळाचे पथक,हलगी पथक, अघोरी मूर्ती झाकी ढोल पथक,झांज पथक,घोडा पालखी रथ, रथामध्ये आकर्षकप्रभू श्रीरामचंद्राचा देखावा राजा दशरथाची हुबेहूब प्रतिकृती यासह विविध झाकी आणि विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजराने उमरखेडकरांचे लक्ष वेधले होते शहरातील मध्यवस्तीत असलेल्या साई मंदिरापासून या शोभा यात्रेला सुरुवात झाली तर स्टेट बँक कॉलनी येथून सार्वजनिक जन्मोत्सव मंडळाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली सुवर्णपथ मार्गे नागचौक बस स्टॅन्ड ते परत साई मंदिर व राम मंदिरअशा पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली होती.
या शोभा यात्रेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तापत्या उन्हातही महिला बालगोपाल तरुण-तरुणी यासह असंख्य राम भक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता . रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने संपूर्ण उमरखेड शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेल्याचे दिसून येत होते शोभायात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उमरखेड पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला असल्याचे यावेळी दिसून येत होते.