नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धनेगाव ग्रामपंचायत अंतर्गत नवीन मुझामपेठ रोडवर सायंकाळाचा सुमारास अज्ञात ईसामाकडुन जाणाराया येणाऱ्या ग्रामस्थ यांना व वाहनचालकांना अरेवारी करून शिवीगाळ करत असल्याने घबाराटीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामपंचायत धनेगाव चे सरपंच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
नांदेड लातुर मुख्य रस्त्यावर असलेल्या धनेगाव ग्रामपंचायत हदीत असलेल्या मुझामपेठ रोडवर टिपु सुलतान चौक ते नवीन मुझामपेठ गावात अनेक अज्ञात मुले नशाबाजी करून , दारू पिऊन, गौधळ घालून या रोडवर मोठया प्रमाणात येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुले, मुली सह ग्रामस्थ यांना त्रास देऊन शिवीगाळ करत असून अनेक जणांना सोबत धक्का बुक्की केली असल्यामुळे दहशत निर्माण झाली असून तात्काळ या अज्ञात इसमाचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामीण पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या कडे संरपच गंगाधर ऊर्फ पिंटू पाटील शिंदे यांनी केली आहे.