हिमायतनगर | संपूर्ण महाराष्ट्रात 1 ऑगस्ट ते 7ऑगस्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून अतिशय उत्साहात राबवल्या जात आहेत. महसूल विभागामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. महसूल सप्ताह निमित्त मौजे सिरंजनी येथे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे व हिमायतनगरच्या तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्रीमती पल्लवी टेमकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला.

जागतिक तापमानातील वाढीमुळे व हवामान बदलामुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडां शिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात….उमेद देतात… म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा असे मत उपविभागीय अधिकारी अविनाशजी कांबळे यांनी व्यक्त केले.

पृथ्वीवरील वने, माती, हवा, पाणी व जैवविविधता यांसह सर्व नैसर्गिक संसाधनांचा काळजीपूर्वक वापर करणे, तसेच पुढील पिढय़ांसाठी त्यांचे संवर्धन करणे, मानव निर्मित कृतीमुळे पृथ्वीवर होणारे प्रदूषण व पर्यावरणाची नासाडी रोखणे किंवा त्याला आळा घालणे. याविषयी जनजागृती होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे असे मत श्रीमती पल्लवी टेमकर, तहसीलदार हिमायतनगर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पवन करेवाड सिरंजनीकर, नायब तहसीलदार श्री पंगे, हिमायतनगर मंडळचे मंडळ अधिकारी श्री चव्हाण, हिमायतनगर सज्जाचे तलाठी श्री पुरी, सिरंजनी सज्जाचे तलाठी शेख, पळसपूर सज्जाचे तलाठी सब्बनवार, विशाल शेवाळकर तसेच सिरंजनी हिमायतनगर शिवारातील शेतकरी उपस्थित होते.
