उस्माननगर, माणिक भिसे। वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड व जिल्हाधिकारी, आणि वनपरिमंडळ लोहा यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र माळाकोळी क्षेत्रातील मौजे वागदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी ,व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गावात वृक्ष लागवड व वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. वन्यजीव सप्ताह निमित्त नियतक्षेञ माळाकोळी अंतर्गत वागदरवाडी येथील जि.प.प्रा. शाळेत जनजागृती, वृक्ष लागवड राबविण्यात आले .
वन्यजीव सप्ताह निमित्त श्री केशव वाबळे साहेब उपवनसंरक्षक नांदेड , भिमसिंग ठाकूर साहेब सहायक वनसंरक्षक ,संदिप शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक नांदेड यांच्या नियोजनाखाली वनपरिमंडळ लोहा अंतर्गत नियतक्षेञ माळाकोळी क्षेत्र वागदरवाडी येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जि.प.प्रा.शाळा या गावात वृक्ष लागवड व वन्यजीव सप्ताह राबविण्यात आले.
यावेळी श्री. क्यादरवाड यांनी वन्यप्राणी व वृक्षलागवड या विषयावरील परिसंवादात बोलताना म्हणाले की , प्रत्येक नागरिकांनी एक तरी वृक्ष ( झाड ) लावून जोपासना केली पाहिजे . वृक्षवल्ली आम्हा सोयरे….याम्हणी प्रमाणे वृक्षांची लागवड केली तर आपणास सावली , ऑक्सिजन’ मिळते. अशा अनेक गोष्टींचा विचार करून नागरिक विद्यार्थी यांनी वृक्षांवर प्रेम केले पाहिजे.
या कार्यक्रमातसाठी आवर्जून उपस्थित असलेले उस्माननगर बीटचे श्री मुंडे , मुख्याध्यापक, कराड मॅडम, डावळे सर, भानंजे सर, अंगणवाडी ताई, व गावातील माधवराव पाटील केंद्रे व शाळेतील विद्यार्थी, व गावातील नागरिक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. श्री ए.एस. क्यादरवाड वनरिमंडळ अधिकारी लोहा, डफडे मॅडम वनरक्षक, पांडुरंगे वनरक्षक, पंढरे वनरक्षक, मुंडे वनरक्षक, घुगे वनरक्षक, मानव आणि वन्यजीव संघर्ष यावर मार्गदर्शन केले. या वेळी जि.प्र. प्रा. शा. वागदरवाडी ता.लोहा येथील आजी व माजी विद्यार्थी तसेच सर्व पदाधिकारी , महिला व पुरुष यांचे शिराढोण बीटचे वनरक्षक नामदेव पंढरे यांनी आभार मानले .