नांदेडराजकिय

निष्पाप २४ नागरीकांच्या मूत्युस कारणीभूत असणाऱ्या बेफीकिर आरोग्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा – उ.बा.ठा.शिवसेना

नांदेड। जिल्हाधिकारी कार्यालयात नांदेड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेच्या हलगर्जी कारभारामुळे निष्पाप २४ नागरीकांच्या मूत्युस कारणीभूत असणाऱ्या बेफीकिर आरोग्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा. अशी मागणी करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.

राज्य सरकारचा जाहिर निषेध करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीने नांदेड येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात विष्णुपूरी येथे रुग्णांची भेट घेऊन महाराष्ट्र राज्यातील शिंदे फडणवीस अजित पवार सरकारचा घडलेल्या घटनेबद्दल जाहिर निषेध करण्यात आला. शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात २४ तासाच्या आत २४ मृत्यू जबाबदार असणाऱ्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी व रुग्णाच्या नात्यवाईकास प्रत्येकी २५ लक्ष रुपये तात्काळ आर्थिक मदत देणे बाबत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते सुहास सामंत, शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर, शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख बबनराव बारसे, शिवसेना नांदेड सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, शिवसेना नेते प्रकाश मारावार, युवासेना महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया समन्वयक अयोध्या ताई पोळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवसेना नेते भुजंगराव पाटील, शिवसेना (नांदेड) जिल्हाप्रमुख माधव भाऊ पावडे, किनवट -माहूर विधानसभा प्रमुख लोकनेते जोतिबा दादा खराटे, शिवसेना व युवासेना नांदेड जिल्ह्यातील सर्व युवासेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख तथा तालुका प्रमुख तथा युवासेना तालुका प्रमुख आणि समस्त शिवसेना युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!