अपघातात उमरखेड तालुक्यातील खरुस येथील तीन जण ठार
उमरखेड,अरविंद ओझलवार। छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय उपचारासाठी जाऊन परत येत असताना वाहनाला अपघात झाल्याने तालुक्यातील खरुस ( बु) येथील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दि ४ मे रोजी पहाटे चार वाजता हिंगोली जवळील नरसी नामदेव रोडवर बेल्लारी पाटी जवळ घडली असून या घटनेत एकाची प्रकृती गंभीर असून त्यास नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .एकाच गावातील तीन जनावर काळाने आकस्मित घाला घातल्याने खरुस गावावर शोककळा पसरली असून आज सायंकाळी चार वाजता त्या तिघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .
अनिरुद्ध उर्फ सेतू तानाजी वानखेडे वय 23 , संतोष कैलासराव वानखेडे वय 22 व सौ अर्चना बाई सुभाषराव वानखेडे वय 40 सर्व रा खरुस ता उमरखेड असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तींचे नाव असून छत्रपती संभाजी नगर येथे वैद्यकीय उपचार करून खाजगी वाहनाने परत येत असताना मराठवाड्यातील हिंगोली जवळ नरसी नामदेव रोडवर बेल्लारी पाटी दरम्यान रस्त्यावरील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वाहनाने झाडाला धडक दिली.
धडक एवढी जबरदस्त होती ती वाहनातील चालक अनिरुद्ध वानखेडे व सौ अर्चनाबाई वानखेडे यांचा जागेवरच मृत्यू झाला रस्त्यावर असलेल्या ढाबाचालकाने ॲम्बुलन्स बोलून उर्वरित जखमींना उपचारासाठी नांदेडला पाठवले असताना रस्त्यात संतोष वानखेडे यांचा मृत्यू झाला तर सुभाष रामराव वानखेडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे . वाहनातील वानखेडे यांचे पाहुणे अनंता चव्हाण रा गोरलेगाव ता हदगाव हा एकमेव व्यक्ती अपघातातून सुव्यवस्थेत बाहेर निघालाअपघातातून सुव्यवस्थित बाहेर निघाला .
अपघाताची घटना कळतात खरूस येथील गावात शोककळा पसरली होती . दरम्यान आज दुपारी चार वाजता मृत झालेल्या तिन्ही व्यक्तीवर खरूस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले एकाच गावातील तीन व्यक्तीवर एकाच दिवशी काळाने घाला घातल्याने संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण होते .