माहूरकडे जाणाऱ्या किनवट आगाराचा धावत्या एसटी बसचा चाक निखळल

किनवट| येथील एसटी महामंडळ बस आगाराच्या किनवट माहूर धावत्या बसचा चाक रविवार दि.१५ रोजी राष्ट्रीय महामार्गावरील पारडी गावाजवळ निखळला आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३९ प्रवाशांचा जीव वाचला असून, हि एसटी बसगाडी ३९ प्रवाशी घेऊन माहूरकडे जात होती.
नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील बस आगाराच्या बसगाड्या नादुरुस्त, भंगार सारख्या झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून, नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्वच बस श्रीक्षेत्र माहूर यात्रेसाठी जादा म्हणून सोडल्या आहेत. किनवट आगारातूनही जादा बसगाड्यांचे नियोजन केले गेले आहे. मात्र रविवारी सकाळी एमएच २० बी ३५३८ माहूरगडाकडे ३९ प्रवाशी घेऊन निघाली. दरम्यान हि बस पारडी असोली गावाजवळ येताच बसचा चाक निखळला.
चालकाच्या वेळीच प्रसंगावधानामुळे एसटी बसमधील प्रवाशी सुखरूप आहेत. मागील आठवड्यात नांदेड किनवट ते नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांना किनवट आगारांची भंगार बसगाड्यांमुळे ४ वेळा बस बदलत नागपूर गाठावे लागल्याचे सांगण्यात आले. हि बाब लक्षात घेता परिवहन महामंडळाने प्रवाशांची कुचंबणा लक्षांत घेऊन किनवट आगाराला नवीन बसगाड्या देण्याची कृपा करून प्रवाश्याना सुरक्षित प्रवासाचा लाभ द्यावा मागणी होत आहे.
