हिमायतनगर। कांडली बु. ग्रामपंचायत अंतर्गत असलेले फुलसिंग तांडा, बळीराम तांडा, कोका तांडा, हदगाव रोड रेल्वे स्टेशन येथील सर्व जाती धर्माचे सर्व समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जरांगे यांच्या चालू असलेल्या उपोषणाला पाठिंबा जाहीर करत राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. तसे निवेदन तहसीलदार हिमायतनगर यांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील मौजे कांडली बु. ग्रामपंचायत अंतर्गत असलेले फुलसिंग तांडा, बळीराम तांडा, कोका तांडा, हदगाव रोड रेल्वे स्टेशन येथील सर्व जाती धर्माचे सर्व समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील जरांगे यांच्या चालू असलेल्या उपोषणाला व तसेच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला समर्थन म्हणून दिनांक २९/१०/२०२३ रविवार रोजी सर्व ग्रामवासीयांची बैठक घेतली. सदरील बैठकीमध्ये सध्या चालू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात गावातील विविध समाजातील नागरिकांनी आरक्षण मागणी विषयी आपापले विचार मांडले, हे विचार मांडत असतांना जवळपास सर्व नागरिकांनी मराठा समाजास आरक्षण लवकरात लवकर मिळावे ह्या हेतूने दिनांक ३०/१०/२०२३ बार सोमवार रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता पासून मौजे कांडली बु. ता. हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे साखळी उपोषण सुरुवात करण्याचा ठाम निर्णय एकमताने घेण्यात आला.
एव्हढेच नाहीतर दिनांक ३०/१०/२०२३ बार सोमवार सकाळी ठीक १०:०० वाजता पासून ते मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांना कोणत्याही संदर्भात व कुठल्याही परीस्थित गावात प्रवेश करू दिल्या जाणार नाही. जर एखादा राजकीय व्यक्ती जबरदस्ती गावात प्रवेश करतांना आढळल्यास त्या विरुद्ध होणार्या कार्यवाहीस ते येणारे राजकीय नेते, कार्यकर्ते, हे स्वतः व त्यांचा संबंधित पक्ष जबाबदार राहील. असे मौजे कांडली व ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या फुलसिंग ताडा, बळीराम तांडा, कोका तांडा, हदगाव रोड रेल्वे स्टेशन येथील सर्व जाती धर्माचे सर्व समाज बांधव गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. असे निवेदन तहसीलदार हिमायतनगर, गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर, उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड, पोलीस उपनिरीक्षक साहेब पोलीस स्टेशन तामसा ता. हदगाव यांना दिले आहे.
तर मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्य वैभव बसवंत बन यांनी दिला आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं गावकर्यांनी स्वागत करून अभिनंदन केलं आहे