सिडको येथील जेष्ठ नागरिक विरंगुळा केद्रांत मनपाच्या वतीने विविध कामे करण्याची मागणी, आयुक्त यांच्यी घेतली भेट
नवीन नांदेडl स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक संस्था सिडको यांच्या वतीने सिडको येथील विरूंगुळा केंद्रासाठी मनपा निधी अंतर्गत विविध कामे करून देण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्यी भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
दिलेल्या निवेदनात, यापूर्वी मनपा निधी अंतर्गत निधी उपलब्ध करून चांगल्या प्रकारे कामे केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे आभार व्यक्त करून विरंगुळा केंद्रात प्रलंबित कामा बाबत, यात पश्चिम बाजूची संरक्षण भिंतीचे बांधकाम करून बाकी भितीची उंची वाढविणे,मध्यभागी एक पोल ग्राऊंड लेवल करून पेव्हर्स बसविने,ग्राऊंड मध्ये जेष्ठांना बसण्यासाठी बेंचेस बसविणे,सर्व बाजूने वृक्षारोपण करणे,विरंगुळा केंद्राच्या दोन्ही रूममध्ये पंख्याची व्यवस्था करणे,खूर्ची, टेबल, कपाट, ग्रंथालय, वाचन कट्टा संपूर्ण नुतनीकरण करणे, पावसाचे बाहेरचे पाणी विरंगुळा केंद्रातून जात असल्यामुळे नाली काढून देणे,विरंगुळा केंद्रात जेष्ठासाठी कॅरम, चेस व व्यायामाचे सामान तसेच साऊंड सिस्टिीम व टिव्हीची व्यवस्था करणे,दोन्ही खोल्यामध्ये सी.सी. टीव्ही. कॅमेऱ्याची व्यवस्था करणे, बोर पाडून व मोटर बसवून पाईप लाईन करून देणे बाबत,जेष्ठ नागरीकांना फिरण्यासाठी चारही बाजूस फुट पाथ करून देणे.
आदी मागण्या केल्या असून अध्यक्ष विश्वनाथ शिंदे,देविदास कदम, सत्यानाराण ऊदंडे,पंढरीनाथ मोटरगे,काशिनाथ गरड, नुरोधदीन ईस्माईल,सौ.भगिरथी बच्चेवार,मनोहर सोनुले,
अरविंद कुलकर्णी, यांनी केली आहे.