नायगाव, रामप्रसाद चन्नावार। दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात व विदेशात सुद्धा हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण देशामध्ये प्रत्येक घराघरात, गावागावात, शहरा शहरात हा सोहळा भगवी पताका, भगवे तोरण पणत्या लावून व रांगोळी काढून श्रीराम जयराम च्या जयघोषात हा सोहळा संपन्न होत आहे.
हा सोहळा म्हणजे हिंदू धर्मियांची अस्मिता, हिंदू धर्मियांचा स्वाभिमान आहे. हा सोहळा संपन्न होत असताना देशांमध्ये राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये व तालुक्यात शहरात सर्व गावागावात धार्मिक संघटनांकडून या सोहळ्याची तयारी करण्यात आलेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा सोहळा अतिशय थाटामाटात उत्साहात संपन्न होणार आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व गावातील दारूची दुकाने व मांसाहराचे दुकाने दिनांक 21 व 22 जानेवारी रोजी बंद ठेवण्यात यावीत जेणेकरून सर्वत्र वातावरण शुद्धीकरण होईल. आणि सर्वांना या आनंदामध्ये सहभाग घेता येईल.
यासाठी जिल्ह्यात दारूबंदी व मांसाहर बंदी 21 जानेवारी व 22 जानेवारी रोजी करण्यात यावी अशी मागणी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी सस्थेकडून जिल्हाधिकारी नांदेड यांना आम्ही वारकरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष हभप राम महाराज पांगरेकर,उपाध्यक्ष हभप गंगाधर हंबर्डे सचिव हभप व्यंकटराव जाधव माळकौठेकर, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंपतराव डाकोरे. उपाध्यक्ष आनंद वाघमारे. जिल्हा प्रसिद्धी प्रमुख कोषाध्यक्ष रामप्रसाद चन्नावार . तालुका प्रसिद्धीप्रमुख गजानन चौधरी.ईत्यादी कडून विनम्र विनंती करण्यात येत आहे.