नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मांजरम येथील तबलीगी जमातच्या इज्तेमाला दिलेली परवानगी बाजार समितीने रद्द केली असून पोलीस ठाणे व ग्रामपंचायत यांची परवानगी घेऊनच पुढील कार्यक्रम करावा अन्यथा बाजार समितीने दिलेली परवानगी रद्द समजावी असे पत्र काढले आहे.
मौजे मांजरम येथील तबलीगी जमातच्या इज्तेमाला अटी व शर्तीच्या आधीन राहून कार्यक्रमाला दिलेली परवानगी बाजार समितीने रद्द केली असून अद्यापही स्थानिक ग्रामपंचायत मांजरम व नायगाव पोलीस ठाणे यांची परवानगी मिळालेली प्रत सादर करण्यात आली नसल्याचे नमूद करत पुढील धार्मिक कार्यक्रम परवानगी घेऊनच करावा अन्यथा बाजार समितीने संदर्भिय पत्रकान्वये दिलेली परवानगी रद्द समजावी तसेच बाजार समितीच्या जागेवर विनापरवाना धार्मिक कार्यक्रम घेऊ नये असे पत्र कृषी उत्पन्न बाजर समिती नायगावच्या वतीने काढण्यात आले आहे.