बहाद्दरपुराच्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर होणार नवीन मूर्तिची प्राण प्रतिष्ठा
कंधार| येथील बहाद्दरपुराच्या पंच क्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर हे अति प्राचीन मंदिरात धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी अकरा वाजता नवीन मूर्तिची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकात पांडुरंग भक्तांना विनम्र प्रार्थना करण्यात येते कि, कंधार येथील बहाद्दरपुराचे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर हे अति प्राचीन मंदिर असून मूर्ती जीर्ण झाल्याने 17 सप्टेंबर रोजी जुन्या मूर्तिचे विधिवत होम हवन, भजन पूजन करून मन्याड नदी पात्रात विसर्जन करण्यात आले. सदरील मंदिरासाठी हिंदू मुस्लिम व सर्व जाती जमातीच्या भाविक भक्तांनी आपली सेवा रुजू केली आहे. मुस्लिम समाजाचे पैगंबर वासी मेहताब बुवा, मातंग समाजाचे कै गोविंदा साधू गायकवाड, माळी समाजाचे कै जीवबा माळी वंजे, निराळी समाजाचे कै जयवंतराव कुरुडे, कै. सुभद्राबाई माणिकराव कुरुडे, मुन्नरवारलू समाजाचे कै जयवंता साधू तोटावाड आदिच्या विठ्ठल सेवेचा आम्ही आदराने उल्लेख करणे आमचे परम करतव्य समजतो.
दि 10नोव्हेंबर शुक्रवारी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी अकरा वाजता नवीन मूर्तिची प्राण प्रतिष्ठा सोहळा होम हवन भजन, पूजनाने आयोजिले आहे. तसेच मूर्तिचे पालखीतून ग्राम प्रदक्षिणाही जल्लोषात आयोजित केली आहे. यात पुरुष महिला बालका सह हजारो भक्त गण सहभागी होणार आहेत. या आनंद सोहळ्यात लोकप्रिय मा. आ. गुरुनाथराव कुरुडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा पुरुषोत्तमजी धोंडगे, मा श्री एकनाथ दादा पवार, कीर्तनकार, नामवंत भजन गायक आदींची उपस्थिती लाभणार आहे. मूर्ती प्राण प्रतिषठे नंतर लगेचच सर्वांनी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी हा धार्मिक सोहळा आनंदादायी बनवण्यासाठी हजारोच्या संख्येने बहाद्दरपुरा येथे उपस्थित राहून सहकार्य करावे. ज्या भाविकांना स्वेच्छेने देणगी द्यावयाची आहे त्यांनी बँक ऑफ बडोदा खाते क्र 78860100018311व मोबाईल पे द्वारा 9890686000 या क्रमांकावर तसेच प्रत्यक्ष मंदिरात जाऊन देणगी द्यावी. अशी प्रार्थना मंदिर प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे. या धार्मिक सोहळ्यास सर्वानी आवर्जून उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन राम अय्यर अध्यक्ष विठ्ठल रुक्माई प्रतिष्ठान, वेंकट महाराज अय्यर, सचिन तानाजी पाटील पेठकर,गणेशराव सावरकर, दिगंबर पेठकर, गणेशराव अय्यर, गणपत माधवराव पेठकर, प्रकाश कुरुडे, सुरेश सूर्यकर गुरुजी, लक्ष्मी्कांत अय्यर, बसवेश्वर पेठकर, तानाजी कुरुंदे, भजने धोंडिबा पा पेठकर देवराव कदम, निवृती गायकवाड, आदींसह सर्वानी केलं आहे.