श्री परमेश्वरच्या महाअभिषेकाने ज्ञानेश्वरी व विना पारायण सोहळ्याने महाशिवरात्री यात्रा महोत्सवाला सुरुवात
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाशिवरात्री निमित्त येथील प्रसिद्ध श्री परमेश्वर देवस्थानच्या भव्य यात्रा महोत्सवाला महाअभिषेक, ग्रंथराज ज्ञानेश्वरी व विना पारायण सोहळ्याने शुक्रवार दि.०७ मार्च पासून सुरुवात झाली आहे. पहिल्याचा दिवशी पारायणासाठी महिला, मुलीनी लक्षणीय उपस्थिती लावली तर हजारो भाविकांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेवून अभिषेक केला. दरम्यान महाशिवरात्रीच्या मध्यरात्री १२ नंतर श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा तहसीलदार यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात होणार आहे.
प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी हरिहर विष्णूच्या अवतारातील उभी असलेलि काळ्या पाषाणातील श्री परमेश्वराची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेतीची नांगरठी करताना शेकडो वर्षापूर्वी एका शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा गावकर्यांनी या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रा उत्सव साजरा केला. तेंव्हापासून महाशिवरात्री पर्वकाळात जवळपास पंधरा दिवस यात्रा भरविली जाते. मंदिर समितीच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते.
माघ कृ.१२ दि.०७ शुक्रवारची यात्रेला सुरुवात झाली असून, सकाळी ६ वाजता श्रीचा महाभिषेक मंदिर संस्थांचे सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आला आहे. तसेच अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायनाला सुरुवात झाली असून, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ श्री हभप. परमेश्वर महाराज डोल्हारीकर हे सांभाळत आहेत. तसेच त्यांच्या मधुर वाणीत पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पठण केले जात आहे. पहिल्याचा दिवशी शहरातील शेकडो महिला, पुरुष व बालभक्तानी ज्ञानेश्वरी पारायणात सहभाग घेतल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
यात सामील झालेल्या परायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला असून, यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच विविध शालेय, कृषी आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर कमिटीचे पदसिद्ध अध्यक्ष सौ.पल्लवी टेमकर या सहपरिवार उपस्थित होऊन श्रीचा अभिषेक करतील. त्यानंतर महाआरती होऊन मध्यरात्री १२ नंतर श्रीच्या मूर्तीचा अलंकार सोहळा पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधिवत संपन्न होणार आहे. त्यानंतर ७ दिवस अलंकार विभूषित श्री परमेश्वराच्या मूर्तीचे दर्शन भाविक भक्ताना घेता येणार आहे. दरम्यान पहिल्या दिवशी हभप पुरुषोत्तम महाराज यांच्या मधुर वाणीतून हरिकीर्तन संपन्न झाले.
यात्रा उत्सव दरम्यान विविध स्पर्धा, पशु प्रदर्शन, शंकरपट स्पर्धा व खेळाचे आयोजन करण्यात आले असून, या पर्व काळात पंचक्रोशीतील भाविक भक्त, शालेय विद्यार्थी व खेळाडूंनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर, उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी आनंता देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, लक्ष्मणराव शक्करगे, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, शाम पवनेकर, संभाजी जाधव, विठ्ठलराव वानखेडे, सौ. लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, राजाराम बलपेलवाड, वामन बनसोडे, प्रकाश शिंदे, माधव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड व लिपीक बाबुरावजी भोयर आणि समस्त गावकरी मंडळीनी केले आहे.
यंत्राच्या आढावा व नियोजन संदर्भात पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड याणी मंदिर सभेत देऊन पाहणी केली तसेच मंदिर परिसरात यात्रा उत्सव दरम्यान शांतात व सुव्यवस्था राहावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरात भक्तांच्या दर्शनासाठी समितीच्या वतीने व्यवस्था करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेताना दूध व केळीचे वितरण तसेच दानशूर व्यक्तीच्या वतीने भव्य फराळाचे वाटप केले जाणार आहे. आणि पिण्याचया शुद्ध पाण्याची देखील सोय करण्यात आली असून, नागरिकांनी दर्शन काळात मंदिर कांती, स्वयंसेवक, पोलिसांना सहकार्य करून उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.