शिवरायांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करतय – खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले रयतेचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शासन करत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, पंचायत समितीचे माजी सभापती बंडू पावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, डॉ. सतीश पाटील उमरेकर, मिलिंद देशमुख, बालाजी सूर्यवंशी, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, महिला व बालकल्याण विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रसाद चन्ना, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, गट विकास अधिकारी अमित राठोड, उपशिक्षणाधिकारी बंधू अमदुरकर, कार्यकारी अभियंता चितळे, उप अभियंता अडबलवार आदींची यावेळी उपस्थित होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे मत खासदार चिखलीकर यांनी यावेळी व्यक्त केले. प्रारंभिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती पुतळ्यास खासदार चिखलीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा जिल्हा परिषद व शिवजयंती मंडळाच्या वतीने उपस्थितांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन मिलिंद व्यवहारे यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी शिवजयंती मंडळाच्या वतीने अन्नदान व शुद्ध पाणी वाटपाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून शहरातील शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास भव्य पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ओमकार कर्मचारी युनियनचे राज्यकारी अध्यक्ष बाबुराव पुजरवाड, जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मंगेश ढेंबरे, सचिव प्रदीप परोडवाड, कार्याध्यक्ष धनंजय गुम्मलवार, कोषाध्यक्ष पवन तलवारे, कर्मचारी युनियन जिल्हा सचिव राघवेंद्र मदनचरकर, शेख मुकरम, विक्रम रेगुंटवार, संतोष राऊत, नितीन पांपटवार, शिवाजी कोल्हे, मोहन हटकर, राजू गोवंदे, उमाकांत हाळे, इंदुमती वाघमारे, सिंपले मॅडम, बालाजी नागमवाड, संतोष मठपती, जितेंद्र तोटलवर, प्रल्हाद थोरवटे, राजू पांगरेकर, शुभम तेलेवार, निलेश बंगाळे, जयप्रकाश वाघमारे, गणेश आंबेकर, गणेश शिंदे, अल्केश शिरशेटवाड, विशाल कदम, संतोष कुलकर्णी, माधव पांडे, शिवाजी मुपडे, किशोर खिल्लारे, गोविंद पोलसवा, विस्तार अधिकारी जीवन कांबळे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद परिसरात एस. गणेश अण्णा व संचाचे भव्य गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नांदेड जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.