पहिल्या शाश्वत परिषदेचे 30 नोव्हेंबर 2023 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड। राज्यातील ख्यातीप्राप्त असलेल्या “अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्या वतीने” राज्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक संस्था आणि सेवाभावी व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. यात नांदेड जिल्ह्यातील प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर आणि गोदावरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या राजश्री पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील ख्याती प्राप्त असलेली अप्रतिम मीडिया फाउंडेशनच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक संस्था आणि सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. अप्रतिम गौरव” हा कार्यक्रम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री भागवत कराड, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,श्री अजित पवार, रोहयो मंत्री श्री संदीपान भुमरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे, श्री अतुल सावे, श्री प्रशांत बंब, श्री रोहित पवार, राज्याचे मुख्य सचिव श्री मनोज सैनिक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू श्री रवींद्र कुलकर्णी, एचडीएफसीचे व्हाईस प्रेसिडेंट श्री चैतन्य डबीर, आमदार श्री आशिष जयस्वाल, श्री अनिल देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.
राज्यातील पहिल्या शाश्वत विकास परिषद व अप्रतिम गौरव या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. यात नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. तीन दशकांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे आणि सध्या *प्रश्न सीमावर्ती भागाचे..! प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर आणि गोदावरी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या राजश्री पाटील यांचा समावेश आहे. अशी माहिती अप्रतिम मीडिया फाउंडेशनचे डॉ. अनिल फळे यांनी दिली.