
नांदेड| जगातील अनेक राष्ट्रात लोकशाहीच्या विकासात राज्यशास्त्राचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर लक्षेटे, अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ स्वा. रा.ती. म. विद्यापीठ नांदेड यानी केले.ते शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ व पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमनिमित्त उद्घघाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जे .सी.पठाण हे होते. मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ रत्नाकर लक्षेटे,डॉ. गणपत कारिकंटे, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, महात्मा गांधी मिशन पत्रकारिता व माध्यम शास्त्र महाविद्यालय नांदेड,डॉ. राज गायकवाड ,डॉ.प्रवीण सेलुकर डॉ.रघुनाथ शेटे, प्रा माधव टेंभुरने ,डॉ.एम.के. खाजी,यांची उपस्थती होती.
डॉ.रत्नाकर लक्षेटे, उद्घाटन करताना म्हणाले, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी समाजातील प्रत्येक गोष्टीचे जागरूक पद्धतीने अवलोकन करून प्रत्येक घटकांकडे पाहिलं पाहिजे. राजकीय, सामाजिक, आर्थिक ,सांस्कृतिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील घडणाऱ्या घडामोडींचं अवलोकन विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
याप्रसंगी डॉ. गणपत करिकंटे यांनी आपले मनोगत व्यक्तकरतांना म्हणाले की भारतीय लोकशाही व्यवस्था आपन समजून घेऊन तिचे संरक्षण केले पाहिजे. एमजिएम, पत्रकारिता महाविद्यालय, नांदेड चे प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांनी पत्रकारिता या विषयावर बोलताना म्हणाले विद्यार्थ्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवलं पाहिजे. पत्रकारिता कोर्स केल्यानंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध असतात त्याचा लाभ घेतला पाहिजे.
याप्रसंगी डॉ. विशाल बेलूर,डॉ.परमेश्वर पौळ, डॉ.पोटंगले,पत्रकार गोविंद टेकाळे ,लक्ष्मीकांत मुळे, शंकर ढगे, संदीप राऊत ,भुजबळ ,गुणवंत सरोदे,मौलासाब पर्डिकर , आनंद सिंनगारे, शेख देलुबकर,सूर्यवंशी,गुणवंत वीरकर,यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष योगेश मोळके, उपाध्यक्ष,साक्षी जाधव,सचिव वैष्णवी सींगारे,सहसचिव,सुनील कांबळे, कौशाध्यक्ष,कृष्णा तिळवाड, सदस्य,अर्चना दुधाते,अनुजा गोरे,ज्योती पिंपळे,सुप्रिया कदम,तनुजा कदम,ऋतुजा माटे,मन्मथ गवळी,शुभम कीर्तने,प्रसाद काकडे यांची नियुक्त करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रघुनाथ शेटे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका प्रस्ताविकातून मांडली. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. मुखतारोद्दिन काजी यांनी केले. तर आभार प्रा.माधव टेंभुर्णी यांनी केले.
