श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील माहूर सरखणी मार्गावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले मौजे लिंबायत गावातील जलजीवन च्या कामासाठी रस्ते खोदून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले असून गावात रात्रीला पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिक रात्री बे रात्री येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला (The condition of the roads of Chikhalat Rasta and the condition of the residents of Chikhaal Limbayat) असून अनेक किरकोळ अपघात होऊन नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत असल्याने संबंधितांनी कामचुकार पणा करणारे ग्रामसेवकावर कारवाई करून तत्काळ रस्ते सुधारणा करत पथदिवे बसवावे अशी मागणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयकांत मोरे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ग्राम विकास अधिकारी यांचे लिंबायत गावाकडे दुर्लक्ष होत आहे पावसाळा सुरु झाला असून गेल्या आठदिवसापासून सतत पाऊस सुरु आहे.रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य झाले असून लिंबायत गावातून मौजे टाकळी या राज्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे चिखलमय पांदण रस्त्यात रूपांतर झाले आहे राष्ट्रीय महामार्गाला लागून मौजे लिंबायत मार्ग टाकळी राज्यमार्गाकडे गेलेल्या रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असल्याचे चर्चेत पूर्ण वर्ष गेले तरीही रस्ता दुरुस्त झाला नाही परिणामी नागरिक रस्त्यातील चिखलापायी त्रस्त झाले आहेत रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण तात्काळ सुरू करावे अशी मागणी जयकांत मोरे यांचे सह मौजे लिंबायतवासीयांनी केली आहे

