24 डिसेंबर रोजी रंगणार नांदेडात 6 वे राज्यस्तरीय डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन
नांदेड| बिसेफ प्रणित डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सहाव्या राज्यस्तरीय डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन नांदेड येथे करण्यात आले आहे. डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय डॉ.अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे ६ वर्ष असून साहित्य संमेलनाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. नांदेड येथील शुभारंभ मंगल कार्यालय जिल्हाधिकारी निवासाच्या पाठीमागे लेबर कॉलनी नांदेड येथे दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता आयोजित या संमेलनाचे उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ. संभाजीनगर येथील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ.प्रा. प्रल्हाद लुलेकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या साहित्य संमेलनात माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, विधान परिषदेचे सदस्य माजी आमदार अमरनाथभाऊ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार जितेश भाऊ अंतापुरकर, माजी आमदार अविनाशजी घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव सुरेंद्रजी घोडजकर, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समिती अध्यक्ष उमेशजी पवळे यांच्यासह अनेक क्षेत्रातील विचारवंत सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
माजी मंत्री कमलकिशोरजी कदम, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, बार्टीचे महासंचालक सुनील जी. वारे , आयकर आयुक्त मुंबई कैलासजी गायकवाड, मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. संजय देशपांडे, दिव्य अमृत कन्स्ट्रक्शन तथा अमृत मॉल विष्णुपुरी नांदेड येथील मॅनेजर डायरेक्टर रोशनसिंग सरदार, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिद्ध व्याख्याते पी. डी. जोशी, लेखक तथा प्रसिद्ध वर्णनकार डॉ. अच्युत बन, गंगापूर येथील मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम, कोकण ज्ञानपीठ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, इत्यादी मान्यवरांचा या साहित्य संमेलनात सत्कार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यभरातील मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन या साहित्य संमेलनात गौरविण्यात येणार आहे. ” भारतीय संविधान हाच फुले आंबेडकरी राष्ट्रवाद”, व “परिवर्तन चळवळी विषयाची माझी भूमिका” या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवादाचे आयोजन या साहित्य संमेलनात करण्यात आले आहे. निमंत्रित कवी यांची काव्य मैफिल ही या साहित्य संमेलनात रंगणार आहे. सकाळी ९;०० वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर बापूराव जमदाडे आणि संच यांच्या शाहिरी जलशाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवसभर चालणाऱ्या या राज्यस्तरीय साहित्य संमेलनास नांदेड जिल्हा व परिसरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष लालबाजी घाटे, निमंत्रक माजी सनदी अधिकारी व्ही. जे. वरवंटकर, महानगरपालिका नांदेडचे माजी कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. जी. एल. सूर्यवंशी, संयोजन समितीचे निमंत्रक एच. पी. कांबळे, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. शंकर गड्डमवार, संयोजन समितीचे सदस्य प्रा. संजयकुमार मांजरमकर, संयोजन समितीचे कोषाध्यक्ष ऍड . एस. एम. गारे यांच्यासह बीसेफ व अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस गणेश तादलापूरकर, यांचीही उपस्थिती होती.