क्राईमनांदेड

रूटमार्च काढून हिमायतनगर शहरात पोलिसांनी केलं कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन

हिमायतनगर, दत्ता शिराणे। आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन हिमायतनगर हद्दीत आज दिनांक 24 रोज गुरुवारी सायंकाळी 5 वाजता सहाय्यक पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आला, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.

विधानसभा निवडणूक -2024 अनुषंगाने हिमायतनगर शहरातुन काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये सहाय्यक पोलीस आधीक्षक उप विभाग भोकर, बीएसएफचे 2 अधिकारी, हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक, 30 कर्मचारी, हिमायतनगर ठाण्याचे 01 पोलीस अधिकारी व 15 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. पोलिसांनी केलेल्या रूट मार्चमुळे हिमायतनगर शहर व तालुक्यात शांतता टिकून राहण्यास मदत होणार आहे, तसेच आगामी विधानसभा निवडणूक शांततेत होण्यास मदत होणार आहे

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!