
भोकर| श्री गणेशोत्सवादरम्यान शहरातील कैलास गडावरील तलावात केलेल्या ५०० श्री मूर्तीच्या विसर्जनावेळी जमा झालेले निर्माल्य संकलन करुन तलावातील पाणी घाण होण्यापासून रक्षण करण्याचा उपक्रम येथील सेवा समर्पण परिवाराने केला.
मागील पाच वर्षीपासून येथील सेवा समर्पण परिवार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवीत आहे. शहरातील कैलास गडावरील ऐतिहासिक तलावात परंपरागत श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात येते. त्यासोबतच पूजाविधीचे विविध साहित्य तलावात टाकण्यात येत असल्याने, तलावातील पाणी घाण होऊन प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी सेवा समर्पण परिवाराने दरवर्षी प्रमाणे यंदा ही पुढाकार घेतला. दीड दिवसाच्या गणपतीपासून अनंत चतुर्दशीपर्यत विसर्जित झालेल्या जवळपास ५०० श्री मूर्तीच्या सोबत भक्तांनी आणलेले निर्माल्य संकलन केले.
या विशेष कार्याचे उपविभागीय अधिकारी अनुपसिंह यादव, तहसीलदार राजेश लांडगे, पोलिस निरीक्षक नानासाहेब उबाळे, आदींसह अनेकांनी कौतुक केले. अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, उपाध्यक्ष दिंगाबर देशमुख, प्रा.उत्तम जाधव,सचिव विठ्ठल फुलारी, प्रकाश देशमुख, प्रा.बालाजी काळवणे,डॉ. किरण पांचाळ, गजानन रेड्डी, संदिप देशमुख, राजू लांडगे, संदिप श्रीरामवार,गंगाधर तमलवाड, डॉ. विश्वास धात्रक, माधव वडगावकर,गजू पाटील, अविनाश देशमुख, किरण देशमुख, अनिल जाधव,गणेश लक्षटवार, विठ्ठल तुपेकर, अंकुश हामंद, मारोती हबंर्डे,रवी देशमुख, डॉ रामेश्वर भाले,अमोल देशमुख, अशोक रेड्डी, भावीन चामुंडा, बालाजी तुमवाड, , पांडुरंग माने,भगवान जोगदंड,चंद्रकांत यशवंकर,डॉ. माधव विभुते,राजू लोलपवाड यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले आहेत
