नांदेडसोशल वर्क

सीईओ मीनल करनवाल यांनी मतदार जागृतीसाठी बारड येथील कन्या शाळेस दिली भेट

नांदेड| लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मतदार जागृती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा बारड येथे भेट दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनीना व शिक्षकांना मतदार जनजागृती विषयी माहिती विचारली. कु. वैष्णवी कदम व शिक्षिका हंबर्डे यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच सीईओ मीनल करनवाल यांनी मुलींना मतदार जनजागृती विषयी मार्गदर्शन केले. मतदार जनजागृती करण्यासाठी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले. शाळेचे काम पाहून समाधान व्यक्त केले.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!