नांदेडसोशल वर्क

कायापालट उपक्रमाच्या ३७ व्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ४५ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी करून दिवाळी साजरी

नांदेड। सतत चौथ्या वर्षी दिवाळीनिमित्त घेण्यात आलेल्या कायापालट या उपक्रमाच्या ३७ व्या महिन्यात भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे रस्त्यावरील ४५ भ्रमिष्ट व्यक्तींची कटिंग दाढी केल्यानंतर उबटन लावून अभंग स्नान घातले.नवीन कपडे व शंभर रुपये बक्षिसी तसेच दिवाळीचा फराळ दिल्यानंतर त्यांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते फटाक्याची आतिषबाजी करत उपेक्षितांची आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.

भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्यात राबविण्यात येतो.नांदेड शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार,बेघर,अपंग, कचरा वेचणारे यांना अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, महेश शिंदे, अभय शृंगारपुरे, संजयकुमार गायकवाड यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर, गोवर्धनघाट नांदेड येथे आणले. डोक्यावरील केस व दाढी वाढलेल्या या सर्वांची स्वंयसेवक बालाजी खोडके यांनी कटिंग दाढी केली. त्यानंतर सुगंधी उबटन लावून सर्वांची मोती साबणाने येथेच्छ आंघोळ घालण्यात आली .

स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यानंतर सर्वांना नवीन पँट ,शर्ट, अंडर पँट, बनियन इत्यादी कपडे व शंभर रुपये दिवाळी बक्षीसी देण्यात आली. संध्या छापरवाल, स्नेहलता जायसवाल, निता दागडिया, सविता काबरा, मंजुळा तुकलवाड,मंगल करडखेडे, ललिता यादव यांच्यासह इतर महिलांनी सर्व निराधारांची ओवाळणी केली. निराधारांच्या हस्ते सुरसुरी,अनार,भूईनले, लड व इतर फटाके वाजविण्यात आले. सर्वांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. हा आगळावेगळा कौतुक सोहळा पाहून अनेकजण गहिवरून गेले.

चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया यांच्या सह इतरांनी सिद्धेश्वर बाबा शिवमंदिरचा परिसर झाडून स्वच्छ केले.ॲड.बी.एच.निरणे यांनी सर्वांना सीताफळे वाटण्यात आली. पोस्ट अल्पबचत संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन शिवलाड, साहेबराव गायकवाड, शिवा लोट यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दुर्गाप्रसाद तोष्णीवाल, गोविंद भुतडा, अनील गाढे, गुरुसिंग चौहान, श्याम भक्कड, गोविंद भूतडा , सुहास पळशीकर,कृष्णा भूतडा यांनी सदिच्छा भेट दिली.

डॉ.दि.बा.जोशी सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर ॲड.चिरंजीलाल दागडीया यांच्या सह अनेकांनी परिसर झाडून स्वच्छ केला. यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी सोमवार ४ डिसेंबर रोजी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले. समाजातील उपेक्षित घटकातील सदस्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल दिलीप ठाकूर व त्यांच्या सर्व टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!