
नांदेड| मुली ह्या मुलांपेक्षा अभ्यासामध्ये नेहमीच पुढे असतात. काळाची गरज बघता त्यांना स्वतःचे स्वसंरक्षणही करता आले पाहिजे, म्हणून मुलींनी अभ्यासासोबत स्वसंरक्षणावरही लक्ष द्यावे, असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते दि. २ एप्रिल रोजी विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे आयोजित मुलींसाठी कराटे प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, प्रा.डॉ. भीमा केंगले कराटे प्रशिक्षक विक्रांत खेडकर यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांनी केले, सूत्रसंचालन कु. प्राजक्ता पांचाळ यांनी तर कु. सोनल पाईकराव यांनी सर्वांचे आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी क्रीडा विभागाचे व. लिपिक संजयसिंह ठाकुर, शिवाजी हंबर्डे, सुनील लुटे, परमजीतसिंग सिद्धू , रतनसिंग पुजारी, शारीरिक शिक्षण विभागाचे पारस यादव, कुलदीप राणा, विजय जाधव, संतोष द्याडे, प्रकाश इबितवार हे परिश्रम घेत आहेत.
