क्राईमनांदेड

अवैद्यरित्या 12 तलवारी व 11 खंजर बाळगणारा एक आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्याबाबत मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक स्थागुशा, नांदेड यांनी शहरात अवैद्य अग्नीशस्त्र बाळगणारे आरोपीताविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्था. गु. शा. चे टिमला आदेश दिले होते.

दिनांक 23/11/2023 रोजी स्थागूशा चे पथकास गूप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, सतर्कता जनरल स्टोअर्स नगीनाघाट नांदेड येथे एक इसमस अवैध्य रित्या तलवारी व खंजर विक्रीसाठी बाळगुन आहे अशी माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन स्थागुशा चे पथकाने सापळा रचुन आरोपी नामे परमजितसिंघ महेंद्रसिंघ रामगडीया वय 40 वर्ष रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड यास ताब्यात घेवुन त्याचे सतर्कता जनरल स्टोअर्स मध्ये अवैध्य रित्या 12 तलवारी व 11 खंजर किंमती 35500/- रुपयाचे विनापरवानगी बेकायदेशिर रित्या विक्रीसाठी बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुध्द पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. 536/2023 कलम 4/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पोलीस ठाणे वजीराबाद यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि परमेश्वर चव्हाण, पोहेकॉ/ शंकर म्हैसनवाड, संभाजी मुंडे, ज्वालासिंघ बावरी, चालक कलीम शेख स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!