क्राईमनांदेड

Tehsildar Surekha Nande’s bold action : तहसीलदार सुरेखा नांदे यांची धाडसी कारवाई रेती उपसा मशीन ट्रॅक्टर सह 30 ब्रास रेती जप्त

हदगाव/नांदेड| जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील येणाऱ्या मौजे कोथळा पैनगंगा नदी पात्रातून रेती उपसा यंत्र, ट्रॅक्टर सह तीस ब्रास रेती जप्तीची कार्यवाही दि. ५रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आली. हि कार्यवाही एकट्या महिला तहसीलदार श्रीमती सुरेखा नांदे यांनी केली. या कार्यवाहीमुळे अवैद्य रेती उत्खनन करणाऱ्या रेतीमाफियांत एकच खळबळ उडाली.

हदगाव शहराच्या उत्तरेकडे पैनगंगा नदी वाहत असून,मागील अनेक महिन्यापासून काही रेतीमाफियांकडून अवैद्य रित्या रेतीचा उपास करून पर्यावरणाला बाधा पोचविली जात आहे. आज जागतिक पयावरण दिन असताना देखील काही अज्ञात लोक मशीनद्वारे नदीपात्रातून अवैद्य रित्या विना परवाना रेती काढत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार नांदे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी आपली खाजगी गाडी घेऊन चालकासह पोहोचल्या.

तहसीलदार आल्याचे पाहताच मशीन चालक व मजूर फरार झाले. शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या शेतातील स्वराज्य ट्रॅक्टर क्रमांक एम ऐच २६बी क्यू९८०३ रेती उपसा मशीन, खोरे, यांच्यासह ३० ब्रास रेती जप्त करण्यात आली. यानंतर सर्व साहित्य जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून जप्त करण्यात आलेली रेती शेतमालक रघुनाथ वानखेडे यांच्या ताब्यात देण्यात आली.

हदगाव तालुक्यात एकट्या महिला तहसीलदारने घटनास्थळी जाऊन कार्यवाही केल्याची ही पहिलीच वेळ आहे . यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, रेती चोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. तहसीलदार यांच्या आदेशावरून मंडळ अधिकारी विजय महाजन, तलाठी विश्वजीत वडकुते, पोलीस पाटील विजय वानखेडे व पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!