करियरनांदेड

नायगाव येथील रुग्णवाहिका कर्मचारी संभाजी पांचाळ यांचा राधेश्याम चांडक यांच्या हस्ते सन्मान

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव येथील बुलढाणा अर्बन सेवा सहकारी सोसायटी नायगावचे कर्मचारी संभाजी पांचाळ हे आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत ग्राहकांना व रूग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देतात.

रुग्णसेवेचा कामाला कधीच न म्हणणारे कुणीही संपर्क केला तर त्यांना हो म्हणत मी आता आलोय एका मिनिटात थांबा. असं म्हणत तात्काळ सेवा देण्याचे काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन रुग्णवाहिका कर्मचारी संभाजी पांचाळ यांचा सन्मान पर्वक आदर करून मायेची शाल पांघरली. तसेच पांचाळ यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना आदर पुर्वक गौरविण्यात आले. यावेळी अध्यक्ष राधेश्याम चांडक डॉ सुकेश झंवर रोशन अग्रवाल संजय धोंगडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!