नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग आणि आय.बी.एफ. कौशल्य अकादमी (बँकेचे अधिकृत भरती व प्रशिक्षण भागीदार) यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस ड्राइव्हचे दि.१० जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता प्रशासकीय इमारतीतील प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग (कक्ष क्र.११४) येथे कॅम्पस ड्राइव्ह आयोजित करण्यात आलेला आहे.

या ड्राइव्हद्वारे विद्यार्थ्यांना थेट अॅक्सिस बँकेच्या वेतनाधिष्ठित (On-Roll) नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. अॅक्सिस बँकेच्या विक्री विभागामध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह या पदावर वार्षिक रुपये २.२० लाख ते २.४० लाख अधिक ६० हजार रुपयांपर्यंत आकर्षक प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. या पदाकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधर (पास आउट) विद्यार्थी पात्र असून वयमर्यादा २१ ते २७ वर्षे असणार आहे. ५० पेक्षा अधिक पदसंख्या असून नांदेड, लातूर, नाशिक, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, धुळे, पुणे, मुंबई व गोवा या ठिकाणी नोकरी करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

कॅम्पस ड्राइव्हबाबतच्या अधिक माहितीसाठी आय.बी.एफ. कौशल्य अकादमीचे शाखा प्रमुख अमर गोडबोले (९९६७९१५१११) आणि विद्यापीठाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. बालाजी मुधोळकर (९०२१८२५१३१) यांच्याशी संपर्क साधावा. या कॅम्पस ड्राइव्हद्वारे पदवीधर विद्यार्थ्यांना एक प्रतिष्ठित बँकिंग संस्थेत नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे.

