नांदेड| येथील कुंटूरकर निवासी कर्मशाळेतील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करीत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. कर्मशाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावरील या क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदक, पाच रौप्य पदक आणि एक कांस्य पदक असे एकूण नऊ पदकांची कमाई केली.
कर्मशाळेच्या दत्ता भारती याने (सरपटत चालणे) या क्रीडा प्रकारात व्दीतीय क्रमांक आणि 100 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात व्दीतीय क्रमांक पटकावला, नितीन जाधव प्रथम क्रमांक (100 मीटर धावणे), प्रथम क्रमांक (200 मीटर धावणे), योगेश गिरबनवाड प्रथम क्रमांक (गोळा फेक), देविदास धुमाळे व्दीतीय क्रमांक (200 मीटर धावणे), व्दीतीय क्रमांक (100 मीटर धावणे), सुभाष सज्जन व्दीतीय क्रमांक (गोळा फेक), तृतीय क्रमांक (100 मीटर धावणे) असे यश प्राप्त केले.
या दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामागे संस्थेचे कर्मचारी खंडागळे मुख्याध्यापक, वाडेकर, पेंडलवार, इरफान अली, अजय कांबळे, गोदगे, सौ. आरती भुरेवार, यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थाचालक अध्यक्ष उत्तम कुंटूरकर यांनी शाल व श्रीफळ देवून अभिनंदन केले व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.