
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ तसेच ‘केंद्रीय आवक/जावक कक्ष’ यांचे उद्घाटन आज कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

विद्यापीठ परिसरात नियमितपणे येणाऱ्या विद्यार्थ्यांना व अभ्यागतांना विविध प्रशासकीय, शैक्षणिक व परीक्षा विषयक कामांसाठी अनेक विभागात जावे लागते. या प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत म्हणून विद्यार्थी सहाय्यता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असून, आज उदघाटन करून त्याचा शुभारंभ करण्यात आला.

या उद्घाटनप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संगीता माकोने, डॉ. महादेव गव्हाणे, डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. संतराम मुंढे, डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सुरेखा भोसले, प्र. कुलसचिव डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंह साबळे,
वित्त व लेखाधिकारी डॉ. पराग भालचंद्र, विशेष कार्यासन अधिकारी डॉ. डी. एम. नेटके, नॅक सेलचे समन्वयक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी, उपकुलसचिव डॉ. रवी सरोदे, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहा. कुलसचिव रामदास पेद्देवाड, रवी मोहरीर, लक्ष्मीकांत आगलावे तसेच विद्यापीठातील विविध प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या दूरदृष्टीतून आणि विद्यार्थ्यांच्या सोयीचा विचार करून सुरू करण्यात आलेले हे विद्यार्थी सहाय्यता केंद्र हे विद्यापीठ प्रशासनाच्या विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोनाचे उदाहरण ठरणार आहे.
