नांदेड| राज्यस्तरीय शालेय टेबल-टेनिस वय वर्षे 14 व 17 मुले व मुलीसाठी क्रीडा स्पर्धा सन 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 30 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड येथे होत आहे. या स्पर्धेचा खेळाडू, क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित राहुन आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन आज शिवछत्रपती पुरस्कारार्थी संजय कडु यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र टेबल टेनिस असो प्रतिनिधी गणेश माळवे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसकीर, क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख चंद्रप्रकाश होनवडजकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, मुख्य पंच राजेश मोपकर, रघोल एस. व श्रीमती एम.एस.खान यांची उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय स्पर्धेचा मुख्य उदघाटन कार्यक्रम 31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, लातूर विभागाचे उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन सचिव डॉ.अश्विन बोरीकर यांची उपस्थिती राहणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातील 9 विभागातून 14, 17 वर्षे वयोगटातील खेळाडू मुले व मुली, पंच, सामनाधिकारी, निवडसमिती सदस्य व स्वयंसेवक असे एकुण 350 सहभागी झाले आहेत. मुले खेळाडूंची निवास व्यवस्था गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास, गुरुद्वारा परिसर, नांदेड येथे तर सर्व खेळाडूंची भोजनाची व मुलींची निवास व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वसतिगृहात करण्यात आली आहे. 14 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धेकरीता निवड समिती सदस्य म्हणुन राज्य क्रीडा मार्गदर्शक पुणे अनिल बंदेल, एन.आय.एस.नागपूरचे अजय कांबळे, संघटना प्रतिनिधी गणेश मालवे , 14 वर्षाखालील मुले व मुली स्पर्धेकरीता निवड समिती सदस्य म्हणुन संभाजीनगरचे राज्य क्रीडा मार्गदर्शक सचिन पुरी, पुणे येथील राज्य क्रीडा मार्गदर्शक असद सय्यद व संघटना प्रतिनिधी रायगड संजय कडु आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, क्रीडा अधिकारी संजय बेत्तीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा प्रमुख चंद्रप्रकाश होनवडजकर, बालाजी शिरसीकर,वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, हानमंत नरवाडे, आनंद जोंधळे, आकाश भोयर, मोहन पवार, सुभाष धोंगडे, उत्तम कांबळे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, नांदेड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि परिश्रम घेत आहेत. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत बॅडमिंटन इनडोअर हॉलमध्ये होत आहे.