पद्मशाली समाजाचा नांदेड येथे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा संपन्न व अभूतपूर्व प्रतिसाद
नांदेड| पद्मशाली समाजाचा राज्यस्तरीय उपव धुवर परिचय मेळावा दि.११ डिसेंबर रोज रविवारी स्व.भुदेवी किशनसेठ गोरंट्याल सभागृह, अग्रसेन भवन दूध डेअरी, नावघाट रोड नांदेड येथे थाटामाटात, पद्मशाली समाज बंधू भगिनींच्या उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न झाला. हा मेळावा मराठवाडा पद्मशाली महिला संघटनेच्या अध्यक्षा कविता गड्डम व नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुशल संघटक असलेले संग्राम निलपत्रेवार यांच्या नेतृत्वात पार पडला.
या परिचय मेळाव्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अखिल भारत पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्रीधरराव सुकंरवार हे होते.विशेष अतिथी म्हणुन आ. कैलास गोरंट्याल, अखिल भारत पद्मशाली संघम अध्यक्ष कंदिगटला स्वामी हैद्राबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमूख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, मा.आ.हनमंत पाटील बेटमोगरेकर, माजी सभापती किशोर स्वामी,माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, सरपंच पिंटू पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, लक्ष्मीकांत गोणे, डॉ.मारोतराव क्यातमवार,शिवसेना नेते प्रकाश मारावार,भाजपा नेते दिलीप कंदकुर्ते, व्यंकटेश जिंदम,शिवदास बोडेवार, गोविंदसेठ कोकुलवार, उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार, उद्योजक विजय भंडारे, रामचंद्र आड़ेपवार, समाजभूषण तुळशीदास भुसेवार, सुभाष बल्लेवार, बालासाब मादसवाड, श्रीनिवास धावरशेट्टी, प्रा. बालाजी कोंपलवार, छत्तीसगढ़चे सुधीर बोदुन, प्रमोद बल्लेवार, सहा.पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार, नागनाथ गड्डम, राजु यन्नम, नागेश कोकुलवार, ईश्वर येमुल, नागभुषन दुर्गम, व्यंकटराव चिलवरवार, प्रा . शंकरराव कुंटुरकर, यांच्यासह अनेक मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. या परिचय मेळाव्यात एका वधुवराचा विवाह करण्यात आला व त्यांना संसार उपयोगी वस्तु भेट देण्यात आली.
अखिल भारत पद्मशाली संघम गौरव अध्यक्ष श्रीधरराव सुंकरवार यांना ” पद्मशाली पद्म रत्न जीवन गौरव ” पुरस्कार व सन्मान पत्र देवून सन्मानित करण्यात आले. यशश्री ग्राफिक्सचे भारत गठ्ठेवार, आकाश अमृतवार यांनी तयार केलेल्या ” शोध मनातील नात्यांचा…” या सुंदर व आकर्षित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिका मध्ये जवळपास एक हजार उपवधू-वर यांच्या नोंदी आहेत. तेलंगाना, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, पुणे, अहमदनगर, सोलापूर, भिवंडी, जालना, लातूर, परळी-वैद्यनाथ, शिरूर ताजबंद,वसमत व नांदेड जिल्ह्य़ातील पद्मशाली समाज बांधव उपस्थित होते व उपवधू-वर यांनी स्वयंस्फूर्त होवून आपला परिचय दिला. या परिचय मेळाव्याचा सभागृहाचा संपुर्ण खर्च आ.कैलास गोरंट्याल यांनी उचलला. भोजनाचा संपुर्ण खर्च दानशूर व्यक्ती समाजभूषण तुलसीदास भुसेवार व उद्योजक विजय भंडारे यांनी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला संघटना पदाधिकारी कविता गड्डम, ललिता निलपत्रेवार, सरस्वती अन्नमवार, कलावती चातरवार, सुषमा बोड्डेवार, पद्मावती गोणे, प्रियंका चित्राल, माधवी गुम्मलवार, कविता मामीडवार, वंदना गुरुपवार, वाणी दुर्गम व युवक संघटनेचे पदाधिकारी शिवाजी अन्नमवार, बाबू अण्णा पिचकेवार,बजरंग येमुल,व्यंकटेश अमृतवार बजरंग नागलवार,नंदू गाजुलवार,भारत गट्टेवार, धनंजय गुम्मलवार, ॲड शैलेंद्र सुरकुटवार, सत्यजीत टिप्रेसवार, व्यंकटेश पुलकंठवार, मनोहर कोकुलवार, अजय चौधरी, संतोष गुम्मलवार, धनंजय माडेवार,भारत राखेवार, श्रीनिवास गुर्रम, प्रविण राखेवार, मधुकर पूर्णेकर, कृष्णा चलिंद्रवार, नविनकुमार पेंटा, गणेश येलेवार, श्रीनिवास गुरम, संतोष कोंकलवार, गणेश गड्डम, गजानन गड्डम, भूमाजी मामीडवार, दत्तप्रसाद सुरकुटवार, दयासागर शिवरात्री यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.