नांदेड| प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्यावतीने प.पु., भारतरत्न, क्रांतीसुर्य, संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती सार्वजनिकरित्या मोठ्या हर्षोउत्हासात साजरी करण्याच्या संदर्भाने दि.27 मार्च 2025 गुरूवार रोजी दुपारी ठिक 1 वाजता एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथील रेस्टहाऊसमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक डॉ.चंद्रकांत वडस्कर हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विभागीय कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, आगार व्यवस्थापक अनिकेत बल्हाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, वाहतुक निरीक्षक मयुर तेलंगे, श्रमिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, कामगार-कर्मचारी सौ.आम्रपाली जमदाडे, रघुनाथराव वाघमारे, बाळू हाटकर, राजेश कांबळे, निर्दोष पवार, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, चंद्रकांत पांचाळ, राहुल गजभारे, यशोदीप अटकोरे, रामेश्वर कांबळे, सिद्धार्थ जोंधळे, राहुल कोकाटे, केशव टोनगे, राजेश शेळके, संजय दुधमल, सुनिल मोरे, गणेश कळसे, अनिल अत्रे, मनोहर माळगे, देविदास दुम्पलवार, दिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ.चंद्रकांत वडस्कर, लक्ष्मीकांत गवारे, अनिकेत बल्लाळ यांनी या बैठकीला मार्गदर्शन करून सर्वांनुमते खालीलप्रमाणे कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. अध्यक्ष म्हणून डॉ.चंद्रकांत वडस्कर, कार्याध्यक्ष अशोक कांबळे, सचिव लक्ष्मीकांत गवारे, सहसचिव राहुल गजभारे, कोषाध्यक्ष गणेश कळसे, सदस्य म्हणून सर्व श्रमिक संघटनेचे पदसिद्ध पदाधिकारी राहतील अशा प्रकारे सार्वजनिक भिमजयंती मंडळाची कार्यकारिणीची निवड घोषीत करण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले तर आभार संतोष ढोले यांनी मांडले. याप्रसंगी नांदेड आगार, विभागीय कार्यालय, वर्कशॉप, टिआरपी (टायर प्लांट) येथील कामगार-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

