नांदेड वाघाळा शहर महागनरपालिकेमार्फत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम
नांदेड l स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत दि.०१ जुलै, २०२४ ते ३१ ऑगस्ट, २०२४ सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान राबविणे बाबत महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र नागरी विकास अधिभयान संचालनालय, मुंबई यांचे निर्देश प्राप्त झाले आहेत, त्यानुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.०६ जुन २४ रोजी सकाळी ११.ते ०२ या वेळेत क्षेत्रिय कार्यालय क्र. ०१ ते ०६ अंतर्गत कल्याणनगर तरोडा (बु), हमालपूरा, विष्णुनगर, मस्तानपुरा, गणेशनगर, यशवंतनगर, देगावचाळ, गंगाचाळ, पक्की चाळ, मिमघाट, गोळ चाळ, त्रिपिटक बुध्द विहार परिसर, गाडेगाव रोड, म्हाडा कॉलनी नवीन कौठा अश्या विविध ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आले आहे.
सदर अभियानात महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांसह शहरातील स्वच्छता प्रेमी नागरीक, जेष्ठनागरीक, इतर कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवून वरील विविध ठिकाणच्या संपूर्ण परिसरात साफसफाई करुन कचरा उचलून घेण्यात आलेली आहे.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, नागरिकांनी सफाई अपनाओ बिमारी भगाओ या अभियानात स्वयंस्पूर्तीने सहभाग नोंदवून मनपा प्रशासनास तसेच नांदेड शहर स्वच्छ व सुंदर करण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
उक्त अभियानात आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपआयुक्त कारभारी दिवेकर, सहाय्यक आयुक्त गुलाम मो. सादेक, क्षेत्रिय कार्यालय क्र.०१ ते ०६ चे क्षेत्रिय अधिकारी सौ.निलावती डावरे, डॉ.मिर्झा रफतुल्ला बेग,रमेश ज. चवर, संजय जाधव,रावणसोनसळे, संभाजी कास्टेवाड, मुख्य स्वच्छता निरिक्षक श्री वसिम तडवी व प्रभाग क्र.०१ ते २० चे सर्व स्वच्छता निरिक्षक यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी हे उपस्थित होते.