नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव शहरातील शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय योजनेचे युवकांचा ध्यास,ग्राम, शहर विकास विशेष शिबीर मौजे पिंपळगाव येथे आजपासून प्रारंभ होत असून या शिबिराच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.वसंतराव चव्हाण हे राहणार असून उद्घाटक म्हणून प्रा.डॉ.मलिकार्जुन करजगी व प्रा.डॉ.शिवाजी कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.
पिंपळगाव येथे आज पासून होणारे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर दिनांक 22 जानेवारी ते एक फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपन्न होणार आहे या शिबिरातील दैनंदिन पर्यावरण विषयक जागृती,बालविवाह निर्मूलन, डिजिटल लिटरसी, ग्राम स्वच्छता व शोषखड्डे, जलसाक्षरता, व्यक्तिमत्व विकास, मतदान जनजागृती, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी जनजागरण, कुपोषण समस्या व उपाय, महिलांचे प्रबोधन, कृषी विषयक प्रबोधन इत्यादी प्रकल्प या शिबिरात राबविल्या जाणार आहे आणि सदर प्रकल्पासह या शिबिरात प्रांत विधी, अल्पोपहार, भोजन, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, व्यायाम ,श्रमदान, विश्रांती, खेळ, भोजन अशी दिनचर्या राहणार असून एक आठवडाभर चालणाऱ्या शिबिरात विविध विषयावर प्रा.डॉ.शंकुतला शिंदे,आर.एम.शिवशेट्टे,प्रा.अश्विनी जक्कावाड,शुभम अरोरा, डॉ.बि.आर.लोकलवार,जे.के.गुट्टे, प्रा.डॉ.गो.रा.परडे, तहसीलदार सौ मंजुषा भगत,प्रा.बालाजी गायकवाड, प्रा.डॉ.प्रकाश हिवराळे, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तर या शिबिरात नागरिकांनी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन प्राचार्य डॉ.के हरिबाबू, प्रा.डॉ.एम.एस.सिद्दिकी, प्रा.डॉ.एस.एस.पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी कपिल पाटील विद्यार्थिनी प्रतिनिधी कोमल वानखेडे,पिंपळगाव नगरीच्या सरपंच मदारबी अहमद शेख, उपसरपंच लक्ष्मीबाई कदम व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.
सदर शिबिरांच्या समारोप समारंभ वेळी अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अमोल काळे जिल्हा समन्वयक नांदेड यांची उपस्थिती राहणार आहे तर संभाव्य भेटी देखील अनेक प्राध्यापकांच्या या शिबिरात होणार आहे.