धनज येथे 30 डिसेंबर पासून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व किर्तन महोत्सवाचे आयोजन

नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव तालुक्यातील धनज या गावात श्री लोकडेश्वर महाराज मूर्ती स्थापना व कळशारोहनाच्या 24 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 डिसेंबर 2023 ते सहा जानेवारी 2024 पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यात अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकूटधाम येथील कथा प्रवक्ते ह भ प भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री यांच्या अमृतवाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. दरम्यान आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी ह भ प संतोष महाराज वनवे बीड कर, दिनांक 31 डिसेंबर 2023 गुरुवर्य ह भ प चंद्रशेखर महाराज देगलूरकर, दिनांक 1 जानेवारी 2024 समाज प्रबोधनकार ह भ प संग्राम बापू भंडारे, दिनांक 2 जानेवारी ह भ प श्रावण महाराज जगताप विसापूरकर, दिनांक 3 जानेवारी रोजी ह भ प अच्युत महाराज दस्तापुरकर, दिनांक 4 जानेवारी रोजी समाज प्रबोधनकार ह भ प निलेश महाराज कोरडे नाशिककर, दिनांक 5 जानेवारी रोजी महंत ह भ प समाधान महाराज भोजेकर आणि दिनांक 6 जानेवारी रोजी कीर्तनकेसरी ह भ प अंकुश महाराज साखरे गेवराईकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
दरम्यान या धार्मिक कार्यक्रमात पहाटे चार ते सहा काकडा आरती, सकाळी सहा ते नऊ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी दहा ते अकरा तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी एक ते पाच या वेळात भागवताचार्य शिवानंद महाराज शास्त्री यांची श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते 11 हरिकीर्तन आणि राञी हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनज गावातील समस्त गावकरी मंडळी प्रयत्न करीत आहेत.
