श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचा नांदेड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात संचार

नांदेड| जगद्गुरु श्रीमन्मध्वाचार्य मूल महासंस्थानांतर्गत, श्री उत्तरादि मठाचे मठाधिपती श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचा नांदेड जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात संचार होत आहे.
बिलोली, बार्हाळी व देगलूरसह, नांदेड येथे श्री स्वामीजींचा संचार श्री उत्तरादि मठ नांदेडच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचे, बुधवार दि.२७ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नांदेड शहरात आगमन होत आहे.
गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभरासाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात पादपूजा, मुद्राधारण, प्रवचन, महापूजा व तीर्थप्रसाद इत्यादींचा समावेश आहे.
हा सोहळा श्रीनिवास गार्डन मंगल कार्यालय, गुरूजी चौकाजवळ नांदेड, येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व ब्रह्मवृंदांनी पारंपरिक वेशात सहभागी होऊन श्री स्वामीजींचा आशीर्वाद ग्रहण करावा, असे आवाहन पंडित महिदासाचार्य धर्माधिकारी, व्यवस्थापक, श्री उत्तरादि मठ नांदेड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
