मुदखेड येथे कार अपघातात मृत्यू झालेल्या शेतमजूरदार महिलेवर उस्माननगर येथे अंत्यसंस्कार
उस्माननगर, माणिक भिसे| मुदखेड ते बारड रोडवरील महात्मा बसेश्वर बायपास चौकात 16 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी भरधाव जाणाऱ्या कारने शेतातून घराकडे जाणाऱ्या उस्माननगर येथील रहिवासी ( हा. मु. मुदखेड) असलेल्या सौ. अरुणाबाई हानुमंत टिमकेकर वय ४५ वर्षीय महिलेला जोराची धडक लागून जागीच ठार झाली होती दिनांक 17 फेब्रुवारी उस्माननगर तालुका कंधार येथे स्मशानभूमीत सश्रू डोळ्याने अंत्यसंस्कार करण्यात आले.
अधिक माहिती अशी की, मुदखेड बारड महात्मा बसवेश्वर बायपास चौकात तीन महीला शेती कामावरून घरी परत येत असताना चारचाकी इनोवा कार गाडी क्रमांक MH26CB७७२२ ने या तीन महीलाना धडक देऊन मोठा अपघात झाला या अपघातात एका महीलेचा जागीच ठार झाली असुन एक महीला गंभीर जखमी झाली असुन एक महिला किरकोळ जखमी आहे सदरील घटना दि.१६ फेब्रु, रोजी दुपारी १:३० च्या दरम्यान घडली आहे.
मुदखेड शहरा लगत असलेल्या महात्मा बसवेश्वर चौकात रोजच्या प्रमाणे येथील अरुणा हनुमंत टिमकेकर, सत्यशीला दिगंबर बानखेडे, व पुण्यरथाबाई माधव कलंबरे हे मुदखेड व्यंकटेश नगर मधील महीला असुन ते सीता नदी जवळील शेतात फुले तोडण्यासाठी जातात फुलं तोडण झाल्यानंतर घराकडे परत येत असताना महात्मा बसवेश्वर बायपास चौकात कार ची धडक होऊन अरुणा हनुमंत टिमकेकर चय ४५ हि महीला जागीच ठार झाली असून एक एक महीला जागीच ठार तर एक गंभीर जखमी महिला सत्वशीला वानखेडे वय ३५ गंभीर सहाय्यक जखमी आहे व पुण्यरथाबाई कलंबरे जखमी झाले असून पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालय दाखल केले आहेत.
अपघात ऐवढा मोठा झाला की, कारने त्या महीला उडविल्या नंतर सदर कार ही बाजूच्या नालीत जाऊन कोसळली सदर कार ही बेधील ब्यापारी पवितवार यांची असून या कारला जीसीबी च्या साह्याने नाल्यातून बाहेर काढण्यासाठी शहरातील नागरिक तसेच आजूबाजूच्या शेतक-यांनी मदत केली. अपघाताची माहिती मिळताच मुदखेड पोलीस निरीक्षक बी. आर कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक शिदे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गीते, जमादार ठाकूर च पोलीस हे तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस क्षणालयात वैद्यकीय उपचारासाठी हलविले तर मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास मुदखेड पोलीस करत आहे. या घटनेमुळे मुदखेड शहरात व उस्माननगर परिसरात हाळहाळ व्यक्त होत आहे.