
नांदेड| विष्णुपुरी ता.जि.नांदेड येथे दि.१८ मार्च २०२५ रोजी मंगळवारी शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे बीज पेरणारे मुत्सद्दी आणि पराक्रमी व्यक्तिमत्व शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांची जयंती शिवस्मारक- जिजाऊ सृष्टी मैदानावर साजरी करण्यात आली.यावेळी गावातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवस्मारक समिती च्या वतीने जिजाऊ सृष्टी मैदानावर शिवस्मारक कंपाऊंड भिंतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभही आयोजित करण्यात आला होता. यासाठी मराठा सेवासंघ नांदेड चे मधुकरराव देशमुख, शे.रा.पाटील, शिवाजीराव खुडे ,इंजि गणेश मोरे, पी.के.कदम, सतीश जाधव आदींची उपस्थिती होती.
संध्याकाळी गावकऱ्यांना छत्रपती संभाजी महाराजांवरील ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी शिवस्मारक समितीतील सदस्य माणिकराव हंबर्डे,शिवाजीराव हंबर्डे, माधव महाराज,कृष्णा हंबर्डे,रामचंद्र शेंबोले, मारोती हंबर्डे, विलास हंबर्डे, गोविंद हंबर्डे, शहाजी हंबर्डे, प्रवीण हंबर्डे,हरीश हंबर्डे, संजू हंबर्डे ,उत्तमराव हंबर्डे,भगवानराव हंबर्डे,राजू हंबर्डे
आदी उपस्थित होते.
