उस्माननगरच्या तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा – माजी सभापती बालाजी पांडागळे
उस्माननगर, माणिक भिसे। अनेक वर्षांपासून तारंकीत पडलेला उस्माननगर तालुक्याच्या मागणीसाठी वारंवार निवेदने ,ठराव देऊन तालुक्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.संबधित निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदानाची खात्री करून उस्माननगरच्या तहसील कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात यावा अशी आग्रही मागणी कंधार पंचायत समितीचे माजी सभापती तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांनी केली आहे.
नव्या निकषाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात नांदेड उत्तर, हदगाव तालुक्यात तामसा, मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद, किनवट तालुक्यात इस्लापूर अशा चार तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश बडदकर यांनी प्रसार माध्यमाला बोलतांना दिली. पण दक्षिण मतदार संघात असणारे उस्माननगर गाव असून पूर्वी निजामाच्या काळात साडबाड या नावाने तालुका म्हणून ओळखला जात होता.
या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी १९९२ पासून आहे. तत्कालिन काळामध्ये लोकनेते कै. माधवरावजी पांडागळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री कै. शंकरराव चव्हाण, आ.कै. साहेबराव बारडकर यांच्याकडे त्यानंतर २०१४ साली पंचायत समिती कंधारचे सभापती असतांना बालाजी माधवराव पांडागळे यांनी पंचायत समितीचा ठराव घेऊन लोकनेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून शासनाकडे उस्माननगरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. म्हणून शासन दरबारी प्रस्ताव देखील दाखल केले आहेत. परंतु निवासी जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसार माध्यमाला माहिती देतांना अशी बाब लक्षात आली की, ४ तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे केला.
ही बाब उघडकीस आली असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून उस्माननगरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. म्हूणन सतत मागणी होत असतांना शासनाकडे ४ च तहसिलचा प्रस्ताव जातो. उस्माननगरची मागणी असून देखील प्रस्ताव जात नाही. ही शोकांतिका आहे. शासनाकडे गेलेले प्रस्ताव परत घेऊन पुर्नप्रस्ताव ज्यामध्ये उस्माननगरचाही प्रस्ताव दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात येणार आहे. उस्माननगर ला तहसिल कार्यालयाचा प्रस्ताव दाखल करून येथील जनतेला दिलासा द्यावा. उस्माननगर अंतर्गत अनेक गावे आहेत.
उस्माननगर हे गाव निजामकालीन तालुक्याचे ठिकाण म्हणून होते. सारभांड नावाने तालुका होता. सारभाडचे रुपांतर उस्माननगर असे झाले. निजामकालीन तालुका असणाऱ्या उस्माननगरला या लोकशाही प्रधान देशात डावलण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या काळात उस्माननगरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा. व तहसिल कार्यालयाची उभारणी व्हावी असा प्रस्ताव सादर करावा. अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल. असा ईशारा कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बालाजी पांडागळे यांनी दिला आहे.
उस्माननगर विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी उस्माननगर ला तालुका करण्यासाठी लागणारी गावे , संख्या सविस्तर माहिती निवेदनाद्वारे शासनाच्या टेबलवर पाठवून दिले आहे.इतर तालुक्यातील गावाची संख्या ,व उस्माननगरला तालुका ( तहसिल कार्यालय) झाल्यास वीस किलोमीटर अंतरावरील नागरिकास चाळीस किलोमीटर अंतर यामधील फरक दाखवला आहे.पूर्वी साडबाड असलेल्या तालुक्याचा स्टॅम्प सुध्दा व नकाशा जोडलेला आहे…