नांदेड| येथील महात्मा फुले हायस्कूलचे सहशिक्षक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणेच्या मराठी भाषा विषयासाठी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
मराठी भाषा अभ्यासक्रमाच्या पायाभूत विषय समितीमध्ये इयत्ता सहावी ते आठवी तसेच इयत्ता नववी व दहावी अभ्यासक्रमासाठी डॉ. राम वाघमारे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक डॉ. राम वाघमारे हे पीएच.डी. धारक असून त्यांचे डोन्ट वरी सर (कथासंग्रह) खेळ, ग्रॅपल, लढा, गुरुजींची शाळा, फाईट फॉर द राईट, इ. कादंबऱ्या व दीपस्तंभ ऊर्जास्त्रोत आक्का, कोहिनूर ए गझल इलाही, सृजनशील अभियंता पुंडलिकराव थोटवे इ. चरित्रात्मक पुस्तके आणि काकांच्या शैक्षणिक गप्पा (शैक्षणिक) जखमांचे सुगंधी पण जपणारा इलाही (संपादित) समकालीन कादंबरीकार भालचंद्र नेमाडे व रंगनाथ पठारे (समीक्षाग्रंथ) इ. साहित्य संपदा प्रकाशित असून त्यांनी काळया’व 98% या शैक्षणिक लघु चित्रपटाची निर्मितीही केली आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, मार्गदर्शक, समीक्षक व मराठी भाषेचे अभ्यासक म्हणून डॉ. राम वाघमारे यांची ओळख आहे. त्यांना विविध साहित्य, सांस्कृतीक व सामाजीक संघटनेच्या वतीने अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
डॉ. राम वाघमारे यांची बालभारतीच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण,माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, संस्थेचे सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोष्याध्यक्ष उदयराव निंबाळकर, कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण, पांडुरंगराव पावडे यांच्या सह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.