नवीन नांदेड। वाढदिवसाच्या निमित्ताने एकीकडे लाखो रुपयांची उधळपट्टी होत असतांना सामाजिक बांधिलकी जोपासत बाभुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच पुंडलिक मस्के यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाभुळगाव, खडकपुरा,हेमला तांडा, राजु तांडा येथील शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य व परिक्षा पॅड वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
१ जानेवारी वाढदिवसाच्या औचित्य साधुन इतरत्र होणाऱ्या अवाढव्य खर्च टाळत सामाजिक कार्यात सहभागी असणारे बाभुळगाव ग्रामपंचायत सरपंच पुंडलिक मस्के यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने गावातील हेमला तांडा, जयसिंग तांडा, खडकपुरा तांडा, राजु तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व परिक्षा पॅड वाटप केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गिरी, कवटीकवार, यांच्या सह शाळेतील शिक्षक वृंद व उपसरपंच काळेश्वर मस्के, माजी पंचायत समिती सदस्य,दाजीबा राठोड, ग्रामपंचायत सदस्य रमेश आडे, प्रेम पवार, गणेश पवार, दता पाटील मस्के,आनंदा गिरी, आंनदा गिरी, भगवान मस्के,जय दरथ मोरे,स्वप्नील पुरी, दिपक मस्के,लक्षमण राठोड, शिवा राठोड, शांताबाई लांडगे, अशोक जाधव, चांदु टेकाळे, बबलू वाघमारे, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते, या उपक्रमाचे अनेकांनी अभिनंदन केले असून नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी ही शुभेच्छा दिल्या.