नांदेडसोशल वर्क

सरदार सरवई पापन्ना गौड जयंती निमित्ताने माणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार संपन्न

नांदेड। सरदार सरवई पापन्ना गौड यांच्या ३७३ व्या जयंती निमित्ताने दि.२४ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता नांदेड शहरातील मिनी सह्याद्री विश्रामगृह येथे भव्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला असून त्या कार्यक्रमात कलाल गौड समाजातील आणि इतर समाजातील निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या आणि काही निवडक जेष्ठ नागरिक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला तसेच गौड जन हकुला पोराटा (मुकुदेब्बा) राष्ट्रीय समिती संलग्न राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा संघर्ष समती महाराष्ट्र राज्य च्या वतीने सन्मानचिन्ह, माणपत्र, मानाचा फेटा,शाल व पुष्पहार देऊन मान्यवरांना सन्मानित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक श्री अमरवेनी नरसा गौड, राष्ट्रीय अध्यक्ष गौड जन हकुला पोरटा समिती (मुकुदेब्बा) हैदराबाद तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगाधर बुचागौड नंदा माजी जि.प.सदस्य हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री कोंडापुरम बलराज गौड,रागूला किरणकुमार गौड (तेलंगना राज्य युवा अध्यक्ष), मोटकुरु शिवाजी गौड,बिलाल श्रीनिवास गौड, दुर्गम वेंकला गौड,बुरा राजाराम गौड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी लढाऊ सरदार सरवाई पापन्ना गौड यांच्या प्रतिमेस मान्य वरांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.तसेच त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.कलाल गौड समाजाचे आराध्य दैवत सरदार सरवाई पापन्ना गौड यांनी देशातील व समाजातील घटकसाठी आपले आयुष्य झोकून दिले. त्यांचे आंध्र आणि तेलंगना फार मोठे योगदान आहे. त्यांचे पहिले स्मारक निर्मल येथे असून देशभर त्यांचे एकशे पन्नास पेक्षा अधिक स्मारके आहेत. महाराष्ट्रा मध्ये त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार असे ते आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी भोकरचे माजी उप नगराध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील कोंडलवार, माजी उपायुक्त शशी मोहन नंदा, कामगार नेत्या कॉ.उज्वला पडलवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय नेते श्री अमरवेणी नरसा गौड व कार्यक्रमाचे अध्यक्ष गंगाधर नंदा व मान्यवरांच्या हस्ते हस्ते जेष्ठ नागरिक पुरस्कार श्री कामाजी जाळोजी रायपलवार, लक्ष्मीकांत बापूराव पडलवार, बाबुराव रामा गौड,बोल्लरवार अंदबोरीकर आणि शेतकरी प्रभाकर महादा गौड बोडेवार आदींना देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष समाजकार्य पुरस्कार माहिती अधिकार तपास समितीचे अध्यक्ष श्री दत्तात्रय पांडुरंग अनंतवार आणि कामगार नेत्या तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सेवानिवृत्त पुरस्कार श्रीमती कमलाबाई श्रीनिवास निलगिरवार, तुळशीराम किशनराव कलंबरकर,व्यकटेश गौड कळगौड सुदलवार, अंत्यशवर गंगाराम कोयलवार, बुधाजी लक्षमनराव नाथेवाड, हिराचंद सायन्ना भुरेवार,गोविंद गणपतराव नाथेवाड,सुधीर सायन्ना भुरेवार, शशी मोहन गंगाधर नंदा,अशोक शिवराम पडलवार,गणेश रंगनाथराव आलेवार, देविदास बाबाराव गौड, सुदाम विठलराव आलेवार, देविदास लक्षमनराव भुरेवार, विशवनाथ पंढरीनाथ तेलंग, गणपती रामलू सुद्दलवार, केशव नारायनराव तेलंग,मारोती नारायनराव कुंडलवार आदींना सन्मानित करण्यात आले.तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अवयव दान चळवळीचे मुख्य प्रवर्तक माधव अटकोरे आणि द हिंदू इंग्रजी वृत्त पत्राचे चांगला प्रेस मिळविलेले नोंदीत कार्यकर्ते तथा कामगार नेते चळवळीतील पॅन्थर कॉ.गंगाधर गायकवाड यांना देखील यावेळी सन्मानचिन्ह, माणपत्र, मानाचा फेटा,शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले.या कार्यकामात प्रमुख उपस्थिती मध्ये बालाजी गोडसे,नागनाथ पाटील,दिलीप चंदनवार, रमेश कोंडलवार, लक्ष्मीकांत सुंदरगिरवार, गणेश नंदेवार, बालाजी सुंदरगिरवार, संजू गौड सुद्दलवार, शामराव पडलवार, माणिक बुरेवार, कैलास जवादवार,भारत कन्नलवार, रामराव पाकलवार आदींजन होते.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा राष्ट्रीय कलाल गौड समाज युवा समितीचे प्रदेश अध्यक्ष सुनील अनंतवार यांचा विचारपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे निवेदक तथा पत्रकार राम तरटे यांनी केले यावेळी त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. सदरील कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्षाच्या हस्ते प्रदेश कार्याध्यक्ष पदी गणेश बोलेवार, जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश घंटलवार तर नांदेड शहर अध्यक्ष पदी अर्जुन नंदेवार यांची निवड करण्यात आली. आभार श्री बाबाराव माधवराव नंदेवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी समितीचे पदाधिकारी संदीप कोंडलवार,नितीन कन्नलवार, नागनाथ कुंडलवार, सुमित गोडसे,शंकर रायपलवार, मनोज अनंतवार, नागनाथ कुच्चेवार आदींनी परिश्रम घेतले. अशी माहिती राष्ट्रीय कलाल,गौड समाज युवा संघर्ष समितीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांनी दिली आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!