
नवीन नांदेड| आगामी सण उत्सव काळात सार्वजनिक मंडळाने कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे सांगून पोलीस प्रशासनाच्या सुचनाचे पालन करून स्वयंसेवक नेमणूक करून दुर्गा नवरात्र शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी आयोजित बैठकीत केले.
ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या वतीने १४ आक्टोबर रोजी शांतता कमिटीच्या आयोजित बैठकीत दुर्गा नवरात्र महोत्सव निमित्ताने येणाऱ्या अडचणी बाबत मडंळानी केलेल्या सुचना बाबतीत अडीअडचणी बाबतीत सुचना ऐकून घेण्यात आल्या यावेळी पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करणाऱ्या नवरात्र दुर्गा महोत्सव मंडळ यांना पारितोषिक तर नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने रोख ५०००/ रूपये पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सांगून यासाठी नवरात्र मंडळाने आनलाईन परवानगी आवश्यक असल्याचे सांगून अडचणी बाबत मंडळाना मार्गदर्शन केले.
या बैठकीस प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,उपनिरीक्षक माणिकराव हंबरडे,जामोदेकर, महेश गायकवाड ज्ञानेश्वर मठदेवरू,यांच्या सह डॉ. नरेश रायेवार, माजी नगरसेवक नाथ यन्नावार,सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सिध्देश्वर नवदुर्गा महोत्सव मंडळ,मॉ.शैरवाली दुर्गा,मॉ जिजाऊ नवरात्र महोत्सव,माह शक्ती दुर्गा ,स्त्री शक्ती दुर्गा महोत्सव मंडळ,नवयुवक दुर्गा मंडळ यांच्या सह विविध मंडळाचे पदाधिकारी महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे सुत्रसंचालन पत्रकार डि. गा.पाटील यांनी केले, यावेळी उपस्थित मंडळ पदाधिकारी यांनी नवरात्र महोत्सव अनुषंगाने तक्रारी केल्या आहेत, त्या सोडविण्यांसाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले.
या बैठकीत नवरात्र दुर्गा स्थापना ते विसर्जन बाबत मंडळाने घ्यावयाची काळजी बाबत योग्य त्या सुचनाचे पालन बाबत माहिती दिली, बैठक यशस्वीतेसाठी वाचक शाखेचे बालाजी दंतापले, चंद्रकांत बिरादार यांनी परिश्रम घेतले.
